

swt2419.jpg
59404
आंबोली : येथे संगीत साधक विद्यार्थ्यांचा सन्मान करताना उपस्थित मान्यवर.
आंबोलीतील संगीत साधक विद्यार्थ्यांचा गौरव
आरोंदा : आंबोली योगा आश्रम येथे भारतीय संगीत विद्यापीठाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आंबोलीतील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात झाला. स्वरधारा संगीत विद्यालय, आंबोली यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या परीक्षेत यश संपादन केलेल्या वैदही गावडे, भक्ती मेस्त्री, अभिषेक बुचुडे, आर्यन परब आणि जय राऊळ या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, सातत्यपूर्ण सराव तसेच पालक व मार्गदर्शकांचे योगदान असल्याचे उपस्थितांनी सांगितले. अध्यक्षस्थानी माऊली भजन मंडळाचे अध्यक्ष शिवराम गावडे होते. यावेळी स्वरधारा संगीत विद्यालयाचे संचालक रमेश मेस्त्री तसेच योगा आश्रमाचे संचालक मच्छिंद्रनाथ बुचुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास अर्जुन गावडे, रामा गावडे, लाडू नाटलेकर, प्रसाद मेस्त्री, कानू गुरव, डुबाजी राऊत, सुभाष राणे, निलेश गुरव, स्वप्निल जाधव, दर्शन गावडे, शुभम मेस्त्री, रोहित मेस्त्री आदी उपस्थित होते. यावेळी आंबोलीतील संगीत व भजन परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. ज्येष्ठांनी जपलेला सांगीतिक वारसा नव्या पिढीने आत्मसात करून ही परंपरा अधिक समृद्ध करावी, अशी भावना व्यक्त करण्यात आली. निवेदन प्रसाद गावडे यांनी केले, तर आभार निलेश गुरव यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.