

59408
सूर्यनमस्कार स्पर्धेत
मोरगाव शाळेचे यश
बांदा, ता. २५ ः ओम नित्य दिव्य योगाश्रम, गोवा, गुरुचरित्र सेवा, दोडामार्ग व दीपस्तंभ फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हळबे महाविद्यालय येथे आयोजित दोडामार्ग तालुकास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेत मोरगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत सुमारे दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत शाळेची विद्यार्थिनी परी ठाकूर हिने तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तनिष्का गोरड हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. याशिवाय दुर्वा ठाकूर, इशा ठाकूर, गौरीता दळवी, श्रावणी परब, अन्वी कदम, आरोही कदम, वेदा कदम, नेहा पिरणकर, प्रणव ठाकूर, मेधांश पिरणकर, शंकर पिरणकर, अद्विक पवार, आयुष कदम, तन्मय कदम आणि आयांश कदम यांनीही यश मिळविले. विद्यार्थ्यांना शाळेतील योगशिक्षिका स्वाती पाटील, संतोष गवस यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका भाग्यश्री कुबल, पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर सावंत, मोरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सुधीर जोशी, सूर्यकांत निर्मळ आदींनी कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.