शिक्षक समितीतर्फे उद्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

शिक्षक समितीतर्फे उद्या 
कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर
Published on

59417

शिक्षक समितीतर्फे उद्या
कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर
सिंधुदुर्गनगरी, ता. २४ ः शिक्षक समिती कोकण विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर बुधवारी (ता. २६) प्राथमिक शिक्षक पतपेढी, ओरोस येथे सकाळी १० ते ५ या वेळेत होणार आहे. यावेळी विविध राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे स्वागताध्यक्ष तथा शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन मदने व नामदेव जांभवडेकर, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, पतपेढी संचालक नारायण नाईक, चंद्रसेन पाताडे, जिल्हा पदाधिकारी आप्पा सावंत आदी उपस्थित होते. कोकण विभागातील सिंधुदुर्गसह रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, जिल्ह्यांतील प्राथमिक शिक्षक समितीचे तालुका, जिल्हा व राज्य पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक चळवळीसाठी ज्येष्ठ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचे आयोजन प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्गने केले असून, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर व कोकण विभागप्रमुख रूपेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले आहे. शिबिरात शासन निर्णय मार्गदर्शन (विजय कोंबे), संघटनेतील कार्यकर्ता कसा असावा (गोपाळ सुरे, अकोला), शिक्षक समिती आणि चळवळ (उदय शिंदे), अशी घडली शिक्षक समिती (चंद्रकांत अणावकर), शिक्षक व शालेय कामकाजाबाबत जागरूकता (दिनकर तळवणेकर) या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com