

डेरवणमध्ये रंगणार क्रीडा स्पर्धा
क्रॉसकंट्रीसह टेबल टेनिस स्पर्धा ; ८ सप्टेंबरला आयोजन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ : डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्यावतीने भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर स्मृती क्रॉसकंट्री आणि जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा ८ सप्टेंबरला होणार आहे. एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात याचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे १२वे वर्ष आहे.
क्रॉसकंट्री स्पर्धेत १२, १४, १६ व १८ वर्षांखालील मुला-मुलींसाठी स्वतंत्र प्रकार ठेवण्यात आले आहेत. १२ वर्षे वयोगटातील मुले व मुलींसाठी २ किलोमीटर, १४ वर्षे वयोगटातील मुले व मुलींसाठी ३ किलोमीटर, १६ वर्षे वयोगटातील मुले व मुलींसाठी ४ किलोमीटर तसेच १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ६ किलोमीटर आणि मुलींसाठी ४ किलोमीटर अंतराची शर्यत घेण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातील युवक व युवतींना आरोग्यदायी आणि स्पर्धात्मक धावण्याचा अनुभव मिळणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५५ हजार रुपयांची रोख पारितोषिके, पदके आणि प्रशस्तिपत्रके प्रदान करण्यात येणार आहेत. क्रॉसकंट्री स्पर्धेसोबतच यावर्षी १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींसाठी जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामधून निवड झालेले खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २ सप्टेंबर ही अंतिम नोंदणी तारीख आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.