

- rat२५p६.jpg-
26O59498
खेड ः तालुक्यातील गुणदे येथील भाग्यलक्ष्मी मंगळागौरी ग्रुपच्या सदस्यांना सन्मानित करताना श्रेया कदम व मान्यवर महिला पदाधिकारी.
मंगळागौरीत भाग्यलक्ष्मी अव्वल!
गुणदेच्या ग्रुपने जिंकले प्रथम पारितोषिक
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २५ ः शिवसेना खेड तालुका महिला आघाडीतर्फे आयोजित तालुकास्तरीय ‘नारीशक्ती मंगळागौर २०२६’ स्पर्धेत भाग्यलक्ष्मी मंगळागौरी ग्रुप, गुणदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या संकल्पनेतून आणि श्रेया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत खेड तालुक्यातील विविध महिला मंडळांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. पारंपरिक मंगळागौरीचे खेळ, विविध प्रकारच्या फुगड्या, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध करून सोडले. महिलांनी सादर केलेल्या कलाविष्कारांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक भाग्यलक्ष्मी मंगळागौरी ग्रुप, गुणदे यांनी पटकावला असून, त्यांना ३५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच द्वितीय क्रमांक रूक्मिणीदेवी महिला मंडळ, खेड यांना मिळाला असून त्यांचा २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांक प्राप्त काळकाई कृपा, भरणे जाधववाडी यांचा १५ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला गेला.
या स्पर्धेचे परीक्षण वर्षा भट-बर्वे (दिवेआगर, श्रीवर्धन) आणि अर्चना जोशी (रत्नागिरी) यांनी केले. स्पर्धकांच्या सादरीकरणातील पारंपरिकता, कौशल्य, वेशभूषा आणि एकूण कलाविष्कार या निकषांच्या आधारे परीक्षकांनी निकाल जाहीर केला. या वेळी महिला सक्षमीकरण, सामाजिक सहभाग आणि सांस्कृतिक परंपरा जपणे काळाची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. महिलांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे हा सोहळा अत्यंत संस्मरणीय ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.