ईद-ए-मिलादुन्नबी जलसा नांदगाव येथे उत्साहात

ईद-ए-मिलादुन्नबी जलसा
नांदगाव येथे उत्साहात
Published on

59748

ईद-ए-मिलादुन्नबी जलसा
नांदगाव येथे उत्साहात
नांदगाव, ता. २६ : नांदगाव येथे ईद ए मिलादुन्नबी जलसा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नांदगाव तिठा गौसिया मस्जिद व खालची मुस्लिम वाडी गौसिया मस्जिद येथून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या.
पैगंबर यांच्या जन्म दिनानिमित्त मुस्लिम मोहल्यात प्रत्येक घरात विद्युत रोषणाई करण्यात आली. दोन्ही गौसिया मस्जिदमध्ये विद्युत रोषणाई केली होती. मिरवणुकीत प्रत्येकाने सरबत, मिठाई आदी पदार्थ पैगंबर जन्म दिनानिमित्त वाटले. पैगंबर जन्म दिनानिमित्ताने कासार्डे बिट अंमलदार झोरे, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, पोलिसपाटील वॄक्षाली मोरजकर, कॄषीअधिकारी पवार, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर व सर्व बंदोबस्त आलेले पोलिस, होमगार्ड, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मिरवणूक नांदगाव तिठा येथे येऊन पैगंबर जन्म दिनानिमित्त विषई तकरीर (भाषण) करण्यात आली व सांगता झाली. यावेळी संपूर्ण मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com