भाजपमध्ये सामान्यांच्या कामाची घेतली जाते दखल

भाजपमध्ये सामान्यांच्या कामाची घेतली जाते दखल
Published on

rat२६p५.jpg-
P26O59738
चिपळूण ः मेळाव्यात मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव
----
कार्यकर्त्यांच्या बळावर पुढची वाटचाल
प्रशांत यादव ः चिपळूण येथील स्नेहमेळाव्याला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः ‘विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अनेक कार्यकर्ते दुःखात होते; मात्र त्यांनी माझी साथ सोडली नाही. हे कमळ माझे नसून तुमची ताकद आणि स्वाभिमान आहे. भाजपमध्ये घराणेशाही नसून सामान्य कार्यकर्त्याच्या कामाची दखल घेतली जाते. राष्ट्र प्रथम नंतर पक्ष आणि शेवटी मी या विचाराने प्रत्येकाने काम केले पाहिजे,’ असे प्रतिपादन भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले.
येथील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात प्रशांत यादव यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या वर्षपूर्तीनिमित्त स्नेहमेळावा व वर्षभरातील कार्याचा अहवाल प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम्, राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली. या वेळी यादव म्हणाले, ‘गेल्या वर्षभरातील माझा राजकीय प्रवास हा केवळ माझा नसून प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पाठीशी उभ्या राहिलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. संकटकाळात नेत्यासाठी जिवाचे रान करणारा कार्यकर्ता हीच माझी सर्वांत मोठी कमाई आहे. कोकणातील शेतकरी, महिला, तरुणांचे प्रश्न सोडवणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी संघटितपणे काम करा. माझ्यामागे खंबीरपणे उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांशिवाय प्रशांत यादव काहीच नाही,’ असे सांगत त्यांनी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच पक्षात सन्मान आणि काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नीतेश राणे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. तसेच आपल्या सार्वजनिक प्रवासात त्याग करणाऱ्या पत्नी, कन्या व कुटुंबीयांच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला.
या कार्यक्रमास भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, सपना यादव, प्रमोद आधटराव, विनोद भुरण, शशिकांत मोदी, रूपेश कदम, मृणाल शेट्ये, रूपाली दांडेकर, सुप्रिया उतेकर, नयना पवार, अंजली कदम, उदय घाग, शुभम पिसे, संदीप भिसे, रामदास राणे, अभिनव भुरण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com