

खतविक्रीचे ॲप तात्पुरते बंद करा
विनोद पवार ः केंद्र सरकारकडे केली मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः तांत्रिक समस्या आणि शेतकऱ्यांमधील डिजिटल साक्षरतेचा अभाव लक्षात घेता चालू खरीप हंगामासाठी नव्याने सुरू करण्यात आलेले ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ हे मोबाईल ॲप्लिकेशन तात्पुरते स्थगित करण्यात यावे, अशी मागणी मिरजोळी ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या या ॲपमुळे शेतकरी, खतविक्रेते आणि कृषी सेवा केंद्र चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. युरिया व डीएपीसारख्या अनुदानित खतांचे आरक्षण आणि वितरण सुव्यवस्थित करण्यासाठी हे ॲप सादर करण्यात आले आहे.
मोबाईल ॲपवरून खतांचे बुकिंग करताना वारंवार तांत्रिक अडचणी येत आहेत. तसेच ॲप सुरू करण्यापूर्वी शेतकरी व खतविक्रेत्यांना कोणतेही योग्य प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. खरीप हंगामात पिकांसाठी वेळेवर खत मिळणे आवश्यक असते; मात्र, ॲपमधील त्रुटींमुळे खत वितरणात विलंब होऊन कृषी उत्पादनावर परिणाम होऊ शकतो आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. चालू खरीप हंगामापुरते हे ॲप तत्काळ निलंबित करावे. या कालावधीत विक्रेते व शेतकऱ्यांच्या व्यावहारिक तक्रारी आणि तांत्रिक त्रुटींचे निराकरण करूनच हे ॲप्लिकेशन पुन्हा कार्यक्षमतेने सुरू करावे, असे मत पवार यांनी मांडले आहे. तसेच खतांची उपलब्धता वेळेत व्हावी यासाठी प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून योग्य पावले उचलावीत, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.