

शिरगावात प्लास्टिकवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः पर्यावरणाचे रक्षण करणे आणि प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी शिरगाव ग्रामपंचायतीने प्लास्टिकबंदीच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिरगाव हद्दीतील सर्व व्यापारी, व्यावसायिक आणि आस्थापनांना ग्रामपंचायतीतर्फे लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या काळात परिसरात प्लास्टिक वापरावर नियंत्रण आणण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक आरोग्याच्यादृष्टीने एकवेळ वापरल्या जाणाऱ्या (सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तूंच्या विक्री, वापर आणि साठवणुकीवर बंदी घातली आहे. या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. प्रतिबंधित प्लास्टिकच्या पिशव्या किंवा वस्तू ग्राहकांना देऊ नयेत; त्याऐवजी कापडी, कागदी किंवा पर्यावरणपूरक पिशव्यांचा वापर वाढवावा, असे व्यापाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे.
शासनाच्या प्लास्टिकबंदी नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास संबंधित व्यावसायिक, दुकानदार अथवा ग्राहकांवर नियमानुसार कडक दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. शिरगाव परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सर्व व्यापारी व नागरिकांनी ग्रामपंचायतीला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.