

संगमेश्वरमधील दोन शाळांना शालेय साहित्य
संगमेश्वर : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हार्दिक जायगडे मित्रपरिवार व युवा संकल्पना यांच्या माध्यमातून संगमेश्वर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत फणसवळे, सांगवे येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी मितेश घडशी व प्रशांत पवार यांनी पुढाकार घेतला.
--------------
चिपळुणात शनिवारी
बोलीभाषेवर संमेलन
चिपळूण ः मराठी साहित्य परिषदेची चिपळूण शाखा, विभा अरविंद ग्रंथालय आणि मोतीवाले परांजपे हायस्कूल यांच्यावतीने शनिवारी (ता. २९) रत्नागिरी जिल्हा बोलीभाषा या विषयावर एकदिवसीय संमेलन आयोजित केले आहे. संगमेश्वरी, बाणकोटी, खारवी, धनगरी इत्यादी बोलींचे स्वरूप, संवर्धन, जतन, वारसा आदी विषयांवर संमेलनात चर्चा, विचारविनिमय होणार आहे. या निमित्ताने कवी संमेलन, संशोधन लेख सादरीकरण आणि लेखक गप्पा असा उपक्रम होणार असून, सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संमेलन चालणार आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रा. संतोष गोणबरे, विजय कदम, प्रशांत देवळेकर, प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी, राजेश खेडेकर, सुहास चव्हाण, धीरज वाटेकर, प्रकाश काणे हे निमंत्रक आहेत. कवी अरूण इंगवले (बोलीभाषा सत्राध्यक्ष), कैलास गांधी, दापोली (कवी संमेलन अध्यक्ष), प्रा. विकास मेहेंदळे (लेखक गप्पा, संशोधन लेख सादरीकरण प्रमुख) म्हणून जबाबदारी पाहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.