संगमेश्वर रेल्वे स्थानकावरून अतिरिक्त फेऱ्या

संगमेश्वर रेल्वे स्थानकावरून अतिरिक्त फेऱ्या
Published on

संगमेश्वर रेल्वेस्थानकावरून एसटीच्या अतिरिक्त फेऱ्या
संगमेश्वर, ता. २६ ः येथील रेल्वेस्थानकावर उतरून देवरूखकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी यासाठी परिवहन महामंडळाने एसटीच्या अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागणार नाही तसेच आर्थिक दिलासाही मिळेल.
माळवाशी येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत यांनी १४ जुलै रोजी एसटी महामंडळ व परिवहन मंत्र्यांकडे याबाबत निवेदन दिले होते. या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत रत्नागिरी विभाग नियंत्रकांनी देवरूख आगाराला या अतिरिक्त फेऱ्या तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या देवरूख आगारातून दुपारी दोन वाजता ''रेल्वेस्थानक–संगमेश्वर–देवरूख'' ही एकमेव बसफेरी उपलब्ध होती; मात्र, रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने एकाच बसमध्ये सर्वांची सोय होत नव्हती. याचा गैरफायदा घेत खासगी वाहनचालक ५०० ते १००० रुपयांपर्यंत मनमानी भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक लूट करत होते. प्रवाशांची ही गैरसोय थांबवण्यासाठी आता सकाळी साडे अकरा आणि दुपारी साडे बारा वाजता करजुवे व माखजनहून सुटणाऱ्या फेऱ्या रेल्वेस्थानकावरून चालवण्यास मंजुरी दिली आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे रेल्वेप्रवाशांसह ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, संगमेश्वर तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com