पाचल येथील 1 हजारविद्यार्थी सहभागी

पाचल येथील 1 हजारविद्यार्थी सहभागी
Published on

- rat२७p१.jpg-
26O59943
पाचल ः येथे आयोजित मार्गदर्शनात सहभागी विद्यार्थी.
---
सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे धडे
पाचल येथे उपक्रम ; एक हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ ः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा ‘सायबर योद्धा क्लब’ आणि ‘क्विक हील फाउंडेशन’ यांच्यातर्फे पाचल येथील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सायबर जागृतीपर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
ओटीपीद्वारे विद्यार्थ्यांची होणारी फसवणूक, सोशल मीडियावरील छायाचित्रांची छेडछाड, सुरक्षित पासवर्डची निर्मिती, हॅकिंग आणि विविध ऑनलाइन आर्थिक गुन्ह्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. अनोळखी व्यक्तींना ओटीपी किंवा गोपनीय माहिती न देणे, संशयास्पद लिंक्स व मेसेजपासून सावध राहणे आणि डिजिटल व्यवहार करताना विशेष खबरदारी घेणे या बाबींवर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे गांभीर्य समजावे यासाठी वास्तविक घटनांची उदाहरणे देऊन मार्गदर्शन करण्यात आले. भामटे नागरिकांना कसे जाळ्यात ओढतात आणि अशा वेळी स्वतःचा बचाव कसा करावा, हे सोप्या भाषेत पटवून देण्यात आले. या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रश्नोत्तरांचे सत्र रंगले. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध शंका विचारून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सायबर योद्धा सृष्टी पाटील, श्रवण बोथले, हर्षदा करलेकर आणि आयुष घाडी यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com