

26O60003
एआय चित्र
जिल्ह्यात ४०० शाळा किचनशेडविना
धान्य ठेवण्यासाठी जागेचा अभाव; अन्न शिजवण्यासाठी पर्यायी जागेचा वापर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः जिल्ह्यातील २ हजार ७१२ शाळांपैकी ४०० शाळांना स्वतंत्र स्वयंपाकघर (किचन शेड) उपलब्ध नाही. सध्या केवळ २ हजार ३१२ शाळांमध्येच ही सुविधा आहे. स्वयंपाकघर नसल्यामुळे पडक्या खोल्यांमध्ये किंवा पर्यायी जागेत स्वयंपाक शिजवला जात आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात शाळांमधील पोषण आहाराची तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. नियमानुसार, पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना दररोज १०० ग्रॅम तांदूळ (१२ ग्रॅम प्रथिने) आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना १५० ग्रॅम तांदूळ (२० ग्रॅम प्रथिने) या प्रमाणात पूरक धान्य दिले जाते. मात्र, जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये हे धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. जिल्ह्यात खेड तालुक्यात सर्वाधिक १०० तर लांजा तालुक्यात ७० शाळांमध्ये अद्याप किचनशेड उभारण्यात आलेले नाहीत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने नवीन स्वयंपाकघरांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.
दरम्यान, रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत किचनशेडच्या दुरुस्तीचा मुद्दा सदस्य नेताजी पाटील यांनी उपस्थित केला होता. यासाठी निधीची तरतूद करावी आणि शाळांमध्ये किचनशेड उभारण्याचा प्रस्ताव बनवण्याची सूचना केली होती.
---
तालुकानिहाय शाळा व किचनशेड नसलेली संख्या
तालुका* एकूण शाळा* किचन नसलेली संख्या
मंडणगड* १५८* २५
दापोली* २९८* ७
खेड* ३५०* १००
चिपळूण* ३७०* ४५
गुहागर* २०९* ५९
संगमेश्वर* ३५४* २३
रत्नागिरी* ३४१* ३०
लांजा* २२५* ७०
राजापूर* ३६६* १६
नगरपालिका* ३३* २५
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.