देवधामापूरच्या विद्यार्थ्यांनी गिरवला भातलावणीचा धडा

देवधामापूरच्या विद्यार्थ्यांनी गिरवला भातलावणीचा धडा
Published on

rat२७p९.jpg-
26O59953
देवरूख ः देवधामापूरचे विद्यार्थी भातलावणी करताना.
---
भातलावणीतून ‘शेतीची शाळा’
देवधामापुरात ‘कृतीशील’ पाठ; श्रमप्रतिष्ठेचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. २७ ः बळीराजा आणि कोकणाची समृद्ध कृषी संस्कृती मुलांपर्यंत बालवयातच पोहोचावी, या उद्देशाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा देवधामापूर (सप्रेवाडी) येथील विद्यार्थ्यांनी कोकणातल्या लाल मातीच्या भातखाचरांमध्ये प्रत्यक्ष उतरून भातलावणीचा कृतीशील धडा गिरवला. ‘पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण’ योजनेअंतर्गत सहकार्य व संघटन या तत्त्वावर हा उपक्रम राबवला जात आहे. या भातलावणी प्रात्यक्षिकातून मिळणारे उत्पन्न थेट शाळेच्या पोषण आहारासाठी वापरले जाते.
यंदा संगमेश्वर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी विजय परीट यांनी शेतामध्ये स्वतः ट्रॅक्टर हाताळून चिखलणीचे प्रात्यक्षिक सादर करत विद्यार्थ्यांना श्रमाची प्रतिष्ठा कृतीतून दाखवून दिली. या वेळी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने सेंद्रिय निविष्ठा उत्पादन उपक्रमांतर्गत ‘गोकृपामृत’ या नैसर्गिक संसाधनाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कृषी सहाय्यक सुवर्णा सिसाळ-वाकसे, कोमल सुर्वे आणि सारिका नाडेकर यांनी शासकीय कृषी योजना व आधुनिक शेती तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी पारंपरिक शेतीची अवजारे व साधनांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. भातलावणी सुरू असताना निवृत्त मुख्याध्यापक अरुण जाधव यांनी कोकणी संस्कृतीतील पारंपरिक ‘भलरी गीते’ सादर करून कार्यक्रमात विशेष रंगत आणली. गावकऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या या एकत्रित सहभागामुळे भातखाचरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गटशिक्षणाधिकारी विजय परीट यांनी उपक्रमाचे कौतुक करताना रोजगाराभिमुख शिक्षण, श्रमप्रतिष्ठा आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व स्पष्ट केले. हा संपूर्ण उपक्रम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश सप्रे, शिक्षक दिलीप महाडिक आणि सतीश वाकसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या वेळी उपाध्यक्षा सुहासिनी भातडे, प्रज्ञा कांबळे, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com