अपूर्ण काँक्रीट रस्ते केव्हा होणार ?

अपूर्ण काँक्रीट रस्ते केव्हा होणार ?
Published on

रस्त्यांच्या दर्जाची चौकशी करा
प्रसाद सावंत ः काँक्रिटीकरणावरून पालिकेस इशारा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : रत्नागिरी शहरातील १०० किलोमीटरचे रस्ते काँक्रिट करण्याचा गाजावाजा नगरपालिकेने केला होता; मात्र, प्रत्यक्षात या रस्त्यांची कामे अपूर्ण असून तयार केलेल्या रस्त्यांचा दर्जाही खालावलेला आहे. याचा फटका सामान्य रत्नागिरीकरांना बसत आहे. त्यामुळे शहरातील काँक्रिटीकरणाचे काम का रखडले? याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी केली आहे.
रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि अपूर्ण कामांवरून पालिकेच्या कारभारावर निशाणा साधताना सावंत म्हणाले, ‘टेंडर निघाल्यापासून कामे वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र मुदत संपूनही कामे अपूर्णच आहेत. अशा ठेकेदारांवर पालिका प्रशासन नोटीस बजावून कारवाई करणार आहे का?’. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि फूटपाथ मोकळे करण्यासाठी तुम्ही सर्वसामान्य फेरीवाल्यांना हटवले, ही चांगली गोष्ट आहे; परंतु, तीच तत्परता दाखवून निष्काळजीपणे केलेल्या काँक्रिट रस्त्याच्या ठेकेदारांची चौकशी पालिका कधी लावणार? असा जाब विचारला आहे. रत्नागिरीकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या या काँक्रिटीकरणाच्या कामाची जबाबदारी तत्काळ निश्चित करावी अन्यथा ठाकरे युवासेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी पालिकेला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com