राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार यांना अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार यांना अभिवादन
Published on

अजित पवारांच्या स्मृतींना उजाळा
सावर्डेत कार्यक्रम ; प्रतिमेस राखी अर्पण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ ः ‘अजित पवार यांचे अचानक जाणे ही आपल्या सर्वांसाठी कधीही न भरून येणारी पोकळी आहे. जनतेशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते, विकासाची तळमळ आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी कायम स्मरणात राहील. आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस राखी अर्पण करताना मन भावूक झाले. दादा आज आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य आणि विचार आपल्याला कायम प्रेरणा देत राहतील,’ असे भावूक उद्‍गार जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम यांनी सावर्डे येथे काढले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते स्व. अजित पवार यांच्या स्मृतीदिनानिमित्त आमदार शेखर निकम यांच्या सावर्डे येथील जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस राखी अर्पण करून त्रिवार अभिवादन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावर्डे विभागातील महिला पदाधिकाऱ्यांनी दादांच्या प्रतिमेला राखी बांधून त्यांच्या प्रेमळ व आधारवड असणाऱ्या स्वभावाच्या आठवणींना उजाळा दिला. ‘सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी आपण दादांसारखेच खंबीरपणे उभे राहू आणि पक्षसंघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करू,’ असा निर्धार या वेळी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
---
पोलिसांना बांधल्या राख्या
रक्षाबंधनानिमित्त पोलिस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावर्डे पोलिस ठाण्यात ‘राखी विश्वासाची, बंध संरक्षणाचा!’ उपक्रम झाला. पूजा निकम यांच्या पुढाकाराने व सावर्डे विभागातील महिला पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी सावर्डे पोलिस ठाण्याचे अधिकारी आबासो पाटील व पोलिस कर्मचाऱ्यांना महिला पदाधिकाऱ्यांनी राखी बांधली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com