

बेडेकर लायन्स ब्लड स्टोरेज
सेंटरचा ६ सप्टेंबरला प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : गरजू रुग्णांना आणीबाणीच्या प्रसंगी तातडीने आणि सुरक्षित रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने लायन्स नेत्र रुग्णालयात ‘सौ. उमा वामन बेडेकर लायन्स ब्लड स्टोरेज सेंटर’ सुरू करण्यात येत आहे. कोल्हापूर येथील वैभवलक्ष्मी रक्तपेढीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या केंद्राचा प्रारंभ रविवारी ६ सप्टेंबरला होणार आहे.
अपघातग्रस्त रुग्ण, आपत्कालीन शस्त्रक्रिया, प्रसूती तसेच गंभीर आजारांमध्ये वेळेवर रक्त मिळणे अत्यंत कळीचे ठरते. याच गरजेची दखल घेऊन हे सेंटर कार्यान्वित केले जात आहे. माणुसकी आणि सेवाभावाचे प्रतीक ठरलेल्या स्व. उमा वामन बेडेकर यांच्या स्मृती केवळ स्मारकात न अडकवता समाजासाठी प्रत्यक्ष उपयोगी पडणाऱ्या सेवाकार्यातून जपण्याचा हा प्रयत्न आहे. याप्रसंगी विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाबाबत डॉ. संतोष बेडेकर म्हणाले, ‘आईच्या नावाने एखादी वास्तू उभारण्यापेक्षा तिचे नाव एखाद्या गरजू रुग्णाच्या प्राणाला आधार देत असेल तर तीच खरी आदरांजली ठरेल. या केंद्राच्या माध्यमातून रक्ताची गरज असलेल्या प्रत्येकाला वेळेवर मदत मिळावी आणि रत्नागिरीत स्वैच्छिक रक्तदानाची चळवळ अधिक व्यापक व्हावी, हा आमचा मुख्य हेतू आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.