

दळवटणे अंगणवाडीत
बालकांचा स्वागत मेळावा
चिपळूण ः तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, चिपळूण नं. १ अंतर्गत बीट अडरे नं. २ मधील दळवटणे बागवाडी अंगणवाडी केंद्रात ‘नवचेतना’ व ‘आधारशिला’ उपक्रमांतर्गत बालक व पालकांचा स्वागत मेळावा उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उदघाटन पंचायत समिती सदस्या मेघा इंगवले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. ‘नवचेतना’ व ‘आधारशिला’ या उपक्रमांची माहिती देताना अंगणवाडी सेविका ऋतुजा इंगवले यांनी पूर्व प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व, आरोग्य व स्वच्छता तसेच बालकांचा सामाजिक, मानसिक, शारीरिक, बौद्धिक व भाषिक विकास याबाबत मार्गदर्शन केले.
----
‘रिगल’ महाविद्यालयाच्या बीसीए
विद्यार्थिनींचे युवा महोत्सवात यश
चिपळूण : रिगल कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीच्या बीसीए विभागातील विद्यार्थिनींनी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या ‘युवा महोत्सवात’ उल्लेखनीय कामगिरी केली. पुणे येथे झालेल्या वेस्ट झोन प्राथमिक फेरीत चार पदके पटकावत रिगलच्या कन्यांनी मुंबईतील अंतिम फेरीत स्थान पक्के केले. एसएनडीटी विद्यापीठातर्फे पुणे येथील के. बी. जोशी महाविद्यालयात ही वेस्ट झोन प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल असा ः मराठी नाटुकली- मराठी इज नॉट जस्ट अनादर लँग्वेज (सुवर्णपदक). पथनाट्य- भ्रष्टाचाराला नाही म्हणा (सुवर्णपदक), मिमिक्री- रौप्यपदक, भारतीय शास्त्रीय नृत्य- शांभवी पोंक्षेने कास्यपदक मिळवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.