तरुणाईला नशेच्या विळख्यातून वाचवा

तरुणाईला नशेच्या विळख्यातून वाचवा
Published on

-rat२९p९.jpg-
26O60414
चिपळूण ः पोलिसांना राखी बांधताना शिवसेना महिला आघाडीच्या सदस्या.
---

नशेच्या विळख्यातून तरुणाईला वाचवा!
शिवसेना महिला आघाडी ः पोलिसांना बांधली राखी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २९ ः रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडी आणि युवती सेनेच्यावतीने चिपळूण पोलिस ठाण्यात पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. शहरातील वाढत्या अमली पदार्थांच्या गैरव्यवहाराला आळा घालून तरुणपिढीला नशेच्या विळख्यातून वाचवा, हीच आमची खरी ओवाळणी, अशी मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली.
या प्रसंगी महिला आघाडी व युवतीसेनेच्या शिष्टमंडळाने पोलिस उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले यांची भेट घेऊन शहरात पसरणाऱ्या ‘नशेच्या बाजारा’बाबत गंभीर चिंता व्यक्त केली. केवळ लहानसहान विक्रेत्यांवर कारवाई न करता यामागील मुख्य सूत्रधार, पुरवठादार आणि संपूर्ण रॅकेटचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शाळा-महाविद्यालय परिसर, संवेदनशील ठिकाणे आणि निर्जन भागात गस्त वाढवण्याची सूचनाही या वेळी करण्यात आली.
उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत आतापर्यंत झालेल्या कारवायांची माहिती दिली. अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा मुळापासून शोध घेऊन या व्यवहारातील मुख्य सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले.
या वेळी शहर संघटक वैशाली शिंदे, युवतीसेना उपजिल्हा अधिकारी नीशा बोभस्कर, तालुका अधिकारी तीर्था लाड, नगरसेविका वैशाली कदम, सुप्रिया वंजारे, फिरदोस कवारे, मानसी चाळके, सेजल कदम व दामिनी दळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होत्या.

Marathi News Esakal
www.esakal.com