ई-पीक पाहणी अ‍ॅपमधील त्रुटींमुळे शेतकरी त्रस्त

ई-पीक पाहणी अ‍ॅपमधील त्रुटींमुळे शेतकरी त्रस्त
Published on

‘ई-पीक पाहणी’ अ‍ॅपमध्ये तांत्रिक त्रुटी
शेतकऱ्यांना योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती; स्वनोंदणीचा पर्याय द्या
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ३१ ः शासनातर्फे सुरू केलेले सुधारित ‘ई-पीक पाहणी’ अ‍ॅप सदोष असून, विविध तांत्रिक त्रुटींमुळे पिकांची नोंदणी करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. परिणामी, शेतकरी शासकीय योजनांचे लाभ आणि पीकविम्याच्या संरक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
केंद्र शासनामार्फत सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी अ‍ॅपचा वापर केला जातो. गतवर्षापर्यंत शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईलवरून पिकांची स्वनोंदणी करण्याची सोय उपलब्ध होती; मात्र, यंदाच्या वर्षापासून प्रत्येक गावात एका साहाय्यकाची नियुक्ती करून त्याच्याद्वारेच नोंदणीचा पर्याय देण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण गावाला एकाच व्यक्तीवर अवलंबून राहावे लागत असून काम संथ गतीने सुरू आहे. अनेक गावांमधील शेतकऱ्यांचे गट नंबर आणि सर्व्हे नंबर अ‍ॅपमधून गायब झाले आहेत. यामुळे पिकांची नोंद कशी करायची, असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. नोंद न झाल्यास खरीप व रब्बी हंगामातील पीकविमा उतरवता येणार नाही. अ‍ॅपमध्ये दर्शवलेले लोकेशन आणि प्रत्यक्ष शेतातील जागा यात मोठी तफावत आहे. शेतावर उपस्थित राहिल्याशिवाय फोटो अपलोड होत नसल्याने, चुकीच्या लोकेशनमुळे फोटो काढणे अशक्य बनले आहे. ७/१२ उताऱ्यावरील मूळ क्षेत्रापेक्षा अ‍ॅपमध्ये कमी क्षेत्र दाखवले जात आहे. त्यामुळे अपुऱ्या क्षेत्राची नोंद करावी लागत असून, भविष्यात नैसर्गिक आपत्ती आल्यास नुकसानभरपाई कमी मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. प्रशासनाने या त्रुटींची तातडीने दखल घेऊन पूर्वीप्रमाणेच अ‍ॅपमध्ये स्वनोंदणीचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
---
कोट १
‘अ‍ॅपमध्ये तातडीने सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे. तसे न झाल्यास अनेक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल. प्रशासनाने गेल्या वर्षीप्रमाणे अ‍ॅपमध्ये सुधारणा करून प्रत्येक शेतकऱ्याला स्वनोंदणीची सोय उपलब्ध करून द्यावी.’
ज्योती करंबेळकर, शेतकरी, कनकाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com