

डेरवणमध्ये ‘महामायक्रोकॉन’ परिषद
५ व ६ सप्टेंबरला आयोजन ; २५० प्रतिनिधींचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ : कोकणातील वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी पहिली राज्यस्तरीय मायक्रोबायोलॉजी परिषद ‘महामायक्रोकॉन २०२६’ डेरवण येथील भ. क. ल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात ५ आणि ६ सप्टेंबर रोजी आयोजित केली आहे. ‘इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट’ आणि ‘वालावलकर वैद्यकीय महाविद्यालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
डेरवण येथील परिषदेत देशभरातील नामवंत मायक्रोबायोलॉजी तज्ज्ञ, प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी आणि सुमारे २५० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. याशिवाय १५ विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील ९० पदव्युत्तर विद्यार्थी, परिचारिका (नर्सिंग स्टाफ) आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही या परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या परिषदेदरम्यान संसर्गजन्य आजारांचे आधुनिक निदान, क्षयरोग, मलेरिया, एचआयव्ही, कोविड-१९, व्हायरल हेपॅटायटिस, रेबिज, वेगाने पसरणारे बुरशीजन्य संसर्ग (फंगल इन्फेक्शन), ‘वन हेल्थ’, ‘अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स’ आणि ‘अँटिमायक्रोबियल स्ट्यूवर्डशिप’ यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कोविड-१९चे नवीन व्हेरियंट्स आणि एचआयव्ही निदानावरील आधुनिक पद्धतींवर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. ही परिषद यशस्वी करण्यासाठी मायक्रोबायोलॉजी विभागप्रमुख डॉ. योगेंद्र शेळके, डॉ. वनिता कुलकर्णी, डॉ. मीना रामतीर्थकर, वैद्यकीय संचालिका डॉ. सुवर्णा पाटील आणि कॉलेज समन्वयक डॉ. नेताजी पाटील विशेष परिश्रम घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.