

देशात सहा लाख वृक्षांची लागवड
जगद्गुरु नरेंद्राचार्य यांची संकल्पना; व्यापक मोहीम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ ः पर्यावरण संवर्धनासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या संकल्पनेतून अवघ्या १५ दिवसांत महाराष्ट्रासह देशभरात ६ लाख १६ हजार ९ वृक्षांची लागवड करण्यात आली. ‘प्रत्येक भक्त एक वृक्ष’ या संकल्पनेतून ७ ते १९ जून या कालावधीत ही व्यापक वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली.
संकल्पपूर्ती सोहळ्यात पुढील वर्षी ११ लाख वृक्षांची लागवड करून ते जगवण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला. या मोहिमेत मराठवाडा उपपीठाने १ लाख ६८ हजार ८८३ वृक्षांची लागवड करून प्रथम क्रमांक मिळवला. पश्चिम महाराष्ट्र क्षेत्राने १ लाख ९ हजार १८३ तर उत्तर महाराष्ट्र उपपीठाने ८२ हजार ६७२ वृक्षांची लागवड केली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पिठे, जिल्हे, तालुके आणि वृक्षमित्रांचा या वेळी गौरव करण्यात आला. उत्कृष्ट जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर पुणे, नाशिक यांचा समावेश आहे. उत्कृष्ट तालुक्यांमध्ये मुखेड, पर्वती आणि सिल्लोड यांचा गौरव करण्यात आला.
नरेंद्राचार्य महाराज म्हणाले, प्रशासनाकडे साधने आहेत; आमच्याकडे लाखो हात आहेत. पुढील वर्षी ११ लाख वृक्ष लावून ते जगवण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. हिरवीगार वसुंधरा हेच आमचे ध्येय आहे. या कार्यक्रमाला खासदार हेमंत सावरा, आमदार राजन नाईक, माजी आमदार हितेंद्र ठाकूर, महापौर आजीव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. श्रद्धा बोडेकर यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.