

- rat१p५.jpg-
26O60997
राजापूर ः साठे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे. या वेळी उपस्थित मान्यवर.
---
विद्यार्थ्यांनी आव्हानांसाठी सज्ज व्हावे
नीलेश सांबरे ः देवाचेगोठणे येथे जिजाऊ संस्थेतर्फे वह्या वाटप
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ : ‘मुले हे देशाचे भविष्य असून ग्रामीण भागातच खऱ्या अर्थाने रत्न घडतात. विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास करून स्वतःचे, गावाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करावे. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आत्तापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी; त्यासाठी जिजाऊ संस्था सर्वतोपरी सहकार्य करेल,’ असे प्रतिपादन ‘जिजाऊ’ संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी केले.
तालुक्यातील देवाचेगोठणे येथील बा. ल. साठे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात जिजाऊ संस्थेच्यावतीने आयोजित मोफत वह्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले, जिजाऊ संस्थेचे सचिव केदार चव्हाण, जिल्हाध्यक्ष महेंद्र मांडवकर, सचिव अविनाश नवाळे, सीईओ संजय नाटेकर, राजापूर पंचायत समितीच्या सभापती नंदिनी कदम, जिल्हा परिषद सदस्या कोमल नवाळे, पंचायत समिती सदस्या स्पृहा गुरव, सरपंच ज्योती सोगम, शालेय समिती अध्यक्ष जयेश जोशी आणि शैलेंद्र शिंदे आदी उपस्थित होते. या वेळी नागले यांच्यासह इतर मान्यवरांनी जिजाऊ संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमास सुभाष नवाळे, प्रभाकर मापेलकर, अक्षय कशेळकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. प्राचार्य महाले यांनी प्रास्ताविकात शाळेची वाटचाल आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. अमर राऊत यांनी सूत्रसंचालन केले तर प्रीती शिंदे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.