-भाट्ये नारळ संशोधन केंद्राला 1 कोटी 20 लाखांचे उत्पन्न

-भाट्ये नारळ संशोधन केंद्राला 1 कोटी 20 लाखांचे उत्पन्न
Published on

जागतिक नारळ दिन----------लोगो


-rat१p१४.jpg-
26O61055
रत्नागिरी ः भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रातील नारळ लागवड.
---
नारळ संशोधनात भाट्ये केंद्राची भरारी

आर्थिक यशासोबत मनुष्यबळाचा गंभीर प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राने संशोधन, रोपेनिर्मिती आणि नारळविक्रीच्या माध्यमातून गतवर्षी १ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आर्थिक यशाचा टप्पा गाठला आहे. नारळ लागवडीसह अंतर्गत मसालापिकांवरील संशोधन आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात हे केंद्र अग्रगण्य मानले जाते; मात्र, गेल्या काही काळापासून संशोधक आणि कर्मचाऱ्यांच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत असल्याने या केंद्राच्या कामकाजावर मोठा परिणाम होत आहे.
दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या या केंद्राची स्थापना केंद्र सरकारने १९५५ मध्ये केली आहे. १९६८ मध्ये हे केंद्र महाराष्ट्र शासनाकडे वर्ग करण्यात आले. सध्या या केंद्रात साडेचार हजारांहून अधिक नारळांची झाडे असून, २७हून अधिक जातींचा संग्रह आहे. ‘कोकण भाट्ये कोकोनट हायब्रिड १’ आणि ‘प्रताप’ हे संकरित वाण याच केंद्राने विकसित केले आहेत. याशिवाय बाणवली, लक्षद्वीप ऑर्डिनरी, फिलिपिन्स, फिजी, केरा संकरा, चंद्रसंकरा आणि गोदावरी गंगा या सात जातींची विशेष शिफारस या केंद्राकडून केली जाते. केंद्रात कोट्यवधींचे उत्पन्न मिळत असले तरी मनुष्यबळाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यालयात आणि संशोधकांसाठी १७ पदे मंजूर असताना प्रत्यक्ष कामावर हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी उपलब्ध आहेत. तसेच मजुरांची स्थिती बिकट असून, ११ पैकी केवळ ३ मजूर कायमस्वरूपी आहेत. शासनाकडून कंत्राटी मजुराला दररोज ४०९ रुपये मजुरी मिळते तर बाहेर ५०० ते ७०० रुपये मजुरी मिळत असल्याने केंद्रात काम करण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे.
---
कोट १
या ठिकाणी अनेक पदे रिक्त आहेत. विशेषतः मजूर मिळणे कठीण जात आहे. शासनाचे मजुरीचे दर आणि बाहेरील दर यातील तफावतीमुळे ही अडचण येत असून, रिक्त जागा भरण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.
-डॉ. के. व्ही. मालशे, केंद्रप्रमुख, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com