इन्टॅक संस्थेने जाणून घेतली कर्णेश्वरची माहिती

इन्टॅक संस्थेने जाणून घेतली कर्णेश्वरची माहिती
Published on

- rat२p१.jpg -
26O61189
संगमेश्वरः कर्णेश्वरची माहिती जाणून घेताना इन्टॅक संस्थेचे प्रतिनिधी.
---
कर्णेश्वरचा वारसा उलगडला

‘इन्टॅक’च्या अभ्यास सहलीत विद्यार्थ्यांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २ ः ‘भारतीय संस्कृती व कला निधी’ (इन्टॅक) या संस्थेने कसबा (ता. संगमेश्वर) येथील पुरातन श्री कर्णेश्वर देवस्थान परिसराचा दौरा केला. या वेळी सहभागी नागरिक व विद्यार्थ्यांनी मंदिर परिसराची पाहणी करतानाच स्थानिक सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाची माहिती जाणून घेतली.
भारतातील अग्रगण्य वारसा संस्थांपैकी एक असलेल्या इन्टॅकच्या देशभरात २१५ हून अधिक शाखा कार्यरत आहेत. ही संस्था ऐतिहासिक, सांस्कृतिक, कला आणि नैसर्गिक वारशाचे संरक्षण, जतन व संवर्धन करते. या संस्थेमार्फत ऐतिहासिक वारशाबाबत जनजागृती, हेरिटेज वॉक, वारसा वास्तूंचे दस्तऐवजीकरण आणि पारंपरिक कलेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. कोकण अध्यायाच्या प्रारंभानिमित्ताने आयोजित या उपक्रमात मौजे कसबा येथील प्राचीन श्री कर्णेश्वर आणि श्री कालभैरव मंदिर संकुलाची अभ्यास सहल घेण्यात आली. या वेळी सहभागी नागरिक व विद्यार्थ्यांनी मंदिर परिसराची पाहणी करत स्थानिक सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाची सविस्तर माहिती जाणून घेतली. या सहलीला लाभलेल्या प्रमुख मार्गदर्शिका सायली पलांडे-दातार यांनी उपस्थितांना श्री कर्णेश्वर मंदिर संकुलाचा इतिहास, वास्तूंवरील मूर्तीशिल्पकला, कोरीव नक्षीकाम, हस्तकारागिरी यासह पुरातत्त्व, विज्ञान आणि धार्मिक-आध्यात्मिक पैलूंची संशोधनात्मक माहिती दिली.
चिपळूण येथील नाणेसंग्राहक गौरव लवेकर यांनी आपल्या संग्रहातील दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन भरवले होते. त्यांनी छोटेखानी व्याख्यानातून या नाण्यांचा इतिहास व त्यांचे महत्त्व उपस्थितांसमोर मांडले. या अभ्यास सहलीत जनता विद्यालय (आंगवली) तसेच डीबीजे महाविद्यालय (चिपळूण) येथील उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थी व शिक्षक उत्साहाने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला अजित राणे, डॉ. गौरव बारटक्के, नेहा राणे, विजय मोरे, पंकज दळवी, कुणाल आणेराव, सिद्धेश लाड, गजानन चितळे, समीर कोवळे, विलास काणे आणि विनीत विचारे यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com