दापोली ः आमसभा 10 रोजी

दापोली ः आमसभा 10 रोजी
Published on

दापोलीची आमसभा १०ला
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २ : दापोली पंचायत समितीची २०२६-२७ या आर्थिक वर्षातील आमसभा गुरूवारी (ता. १०) आयोजित केली आहे. सकाळी ११ वाजता राधाकृष्ण मंदिर येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
आमसभेच्या अनुषंगाने दापोली तालुक्यातील नागरिकांनी आपली निवेदने पंचायत समिती दापोली कार्यालयाकडे सोमवारी (ता. ७) सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करावीत, असे आवाहन गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी केले आहे. तसेच प्रत्येक निवेदन स्वतंत्र ए-४ आकाराच्या कागदावर असून ते पाच प्रतींमध्ये सादर करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या आमसभेत महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आदी विविध विभागांशी संबंधित प्रश्न प्रामुख्याने चर्चा होईल. गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही तालुक्यातील अनेक रस्त्यांची झालेली दुरवस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. हा विषय चर्चेला येईल. दापोली-हर्णै हा मुख्य राज्यमार्ग खड्ड्यांमुळे अत्यंत खराब झाला असून, पर्यटनाच्यादृष्टीने हा तालुक्यातील महत्त्वाचा मार्ग मानला जातो. या मार्गावरील खड्डे भरण्याचे काम सुरू असले तरी त्याच्या दर्जाबाबत नागरिक व वाहनचालकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com