

rat२p१३.jpg-
P26O61202
रत्नागिरी ः आम्ही सिद्ध लेखिका ‘रिमझिम रिमझिम’ या काव्यमैफलीत सहभागी कवी-कवयित्री.
----
रत्नागिरीत कवितांनी फुलली ‘रिमझिम’
‘आम्ही सिद्ध लेखिका’चा उपक्रम; कवितांचे ई-बुक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २: ‘आम्ही सिद्ध लेखिका’ अखिल भारतीय साहित्य संस्था यांच्यावतीने स्थानिक कवी व कवयित्रींसाठी आयोजित ‘रिमझिम रिमझिम’ हा काव्यमय कार्यक्रम रत्नागिरीत उत्साहात झाला. स्थानिक कवी-कवयित्रींना काव्यप्रतिभा सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शहरातील अ. के. देसाई हायस्कूलच्या रंगमंचावर ही काव्यमैफल रंगली. कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला. या प्रसंगी संस्थेच्या कोकण विभाग प्रमुख सुनेत्रा जोशी, कार्यकारिणी सदस्य ऋतुजा कुलकर्णी आणि ज्येष्ठ सदस्या कुंदा बापट उपस्थित होत्या. या प्रसंगी जोशी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. राज्य कार्यकारिणीत प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांनी ऋतुजा कुलकर्णी यांचे कौतुक केले. ‘नवकवींनी झटपट प्रसिद्धीच्या मागे न लागता सातत्याने लेखनाचा सराव करावा व सादरीकरणाची कला आत्मसात करावी,’ असा सल्ला त्यांनी या वेळी दिला. प्रा. उमा जोशी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची पार्श्वभूमी व संस्थेचे काम विशद केले. या मैफलीत एकूण २० कवी-कवयित्रींनी सहभाग घेतला. पावसाळा, निसर्ग, श्रावण आणि विविध भावविश्व उलगडणाऱ्या कवितांनी ही संध्याकाळ बहारदार झाली. यात वैजयंती पाटील, शमा प्रभुदेसाई, दीप्ती झगडे, प्रियांका रांजे, शर्विल रांबाडे, अनुष्का नागवेकर, श्रावणी शिंदे, कुंदा बापट, चित्रा गोस्वामी, वसुंधरा जाधव, रोहित नाटेकर, मानसी चव्हाण, प्रभात कोकझे, स्नेहल शेवडे, गौरी थत्ते, उमा जोशी, विस्मया कुलकर्णी, तन्वी पटवर्धन, अनुराधा आपटे, सुनेत्रा जोशी आणि ऋतुजा कुलकर्णी यांनी आपल्या कविता सादर केल्या.
दरम्यान, उत्कृष्ट कविता व प्रभावी सादरीकरण करणाऱ्या कवींना पुस्तक देऊन गौरवण्यात आले तर सर्व सहभागींना पेन देऊन प्रोत्साहित करण्यात आले. या कार्यक्रमात सादर झालेल्या सर्व कवितांचे ‘ई-बुक’ तयार केले जाणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.