चिपळूण पालिकेने त्या कामांविषयी माहिती द्यावी

चिपळूण पालिकेने त्या कामांविषयी माहिती द्यावी
Published on

‘त्या’ कामांविषयी माहिती द्या...
नित्यानंद भागवत ः चिपळूण पालिकेकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ : चिपळूण नगरपालिकेने यापूर्वी शहरविकास आराखड्यातील मंजूर नवीन रस्ते तसेच विविध प्रयोजनांसाठी आरक्षित जागांवर नदीतील गाळ टाकून भराव केला. काही ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरणही केले. यामुळे बाधित जागामालकांना नोटीस दिली आहे का? संबंधितांना मोबदला दिला आहे का? याबाबत प्रशासनाने स्पष्टता करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद भागवत यांनी केली आहे.
भागवत म्हणाले, ‘शहरातील मंजूर शहरविकास आराखड्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौक या दोन प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कामासाठी आवश्यक जागांची मोजणी व मूल्यांकन करण्यास बुधवारपासून सुरवात झाली. शहरविकास आराखड्यातील टीपी-०१ मंजूर झाल्यानंतर या भागातील रस्ते आणि विविध आरक्षणांमुळे अनेक जागांच्या हद्दींमध्ये बदल झाले आहेत. जुन्या सातबारा उताऱ्यांमध्ये बदल होऊन नवीन प्रॉपर्टी कार्ड तयार केले आहे. त्यामुळे नव्या आराखड्यानुसार जागामालकांच्या बदललेल्या हद्दी निश्चित करून देण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. नवीन प्रॉपर्टी कार्ड तयार करताना काही ठिकाणी जुन्याच नावाने नोंदी आहेत. अद्ययावत अभिलेखानुसार नावे नोंदवली गेली नसल्यास संबंधित जागामालकांना नाव दुरुस्तीसाठी कार्यालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. पालिका आणि भूमिअभिलेख विभागातील समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांना वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च सहन करावा लागत आहे. याबाबत प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com