राजापुरात गोविंदा पथकांचा रात्री उशिरापर्यंत सराव

राजापुरात गोविंदा पथकांचा रात्री उशिरापर्यंत सराव
Published on

- rat३p४.jpg-
26O61434
राजापूर ः दहीहंडीसाठी मानवी मनोरे उभारण्याचा सराव करताना गोविंदा पथक.

राजापुरात गोविंदा पथकांचा सराव
गोपाळकाला उत्सवाची धूम; मूर्तीकारांची लगबग
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ ः गोपाळकाला उत्सवाचे वेध सर्वत्र लागले आहेत. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर मानवी मनोरे रचून मानाची हंडी फोडण्यासाठी राजापूर तालुक्यातील गोविंदा पथकांकडून सध्या जोरदार सराव केला जात आहे. राजकीय नेते व विविध मंडळांनी जाहीर केलेल्या मोठमोठ्या बक्षिसांमुळे यंदाच्या मानवी मनोऱ्यांच्या स्पर्धेत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे, मूर्तीकारांच्या कार्यशाळांमध्ये श्रीकृष्णाची मूर्ती रंगवण्याची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे.
राजापूर तालुक्यात दरवर्षी गोपाळकाला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ठिकठिकाणी बांधलेल्या मोठ्या रकमेच्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये दरवर्षी चढाओढ पाहायला मिळते. सर्वाधिक उंचीवरील दहीहंडी फोडणे, हे प्रत्येक पथकासाठी प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे महिनाभरापासून सुरू असलेल्या सरावाला आता अंतिम टप्प्यात मोठा वेग आला आहे. यंदा शहरातील दिवटेवाडी (पवारमंडळी), आंबेवाडी, रूमडेवाडी, खडपेवाडी, चव्हाणवाडी या पथकांसह ग्रामीण भागातील दसूर, चिखले, भू, ओणी, आडीवरे, कणेरी इत्यादी गोविंदा पथके मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली आहेत. तालुक्यातील दहीहंड्यांवर आपले वर्चस्व गाजवण्यासाठी या पथकांचा सराव सायंकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
---
वैशिष्ट्यपूर्ण हंड्यांना मागणी
उत्सवाचा माहोल कॅच करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक रकमेची दहीहंडी उभारण्यासाठी मोठी स्पर्धा लागली आहे. त्यामुळे यंदा तालुक्यात सर्वात मोठी हंडी कोण बांधणार या विषयी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. दहीहंड्या तयार करणाऱ्या स्थानिक कारागिरांचे कौशल्यही चर्चेचा विषय ठरत आहे. हंडीवर केलेले आकर्षक नक्षीकाम आणि सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, या वैशिष्ट्यपूर्ण हंड्यांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com