

rat३p६.jpg-
26O61457
रत्नागिरी : तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान विद्यार्थी मेळाव्यात विजेत्या विद्यार्थ्यांसमवेत मागे उभे मान्यवर अश्विनी काणे, सोनाली पाणकर, विजयानंद निवेंडकर आदी.
--
तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात
‘जीजीपीएस’ची शाल्वी प्रथम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : जीजीपीएस प्रशालेत आयोजित तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान विद्यार्थी मेळाव्यातील स्पर्धेत प्रथम क्रमांक जीजीपीएसच्या शाल्वी शिवगणने तर द्वितीय क्रमांक फाटक हायस्कूलच्या मुक्ता बापटने, तृतीय क्रमांक सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट सिटी हायस्कूलच्या आईशा मुल्ला यांनी पटकावले. यामधून जिल्हास्तरीय मेळाव्यासाठी प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
तालुक्यातील १३ शाळांनी यात सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे माहिती विशद करण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेमध्ये भारतीय ऊर्जाक्षेत्र २०४७चे भवितव्य- संधी आणि आव्हाने या विषयावर विद्यार्थ्यांनी भाषणे केली. या स्पर्धेसाठी परीक्षणाचे काम रूपेश यादव, प्रकाश परांजपे, सायली केतकर यांनी पाहिले. या मेळाव्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नागिरी पंचायत समिती विषयतज्ज्ञ अश्विनी काणे यांनी केले. तालुका विज्ञान मंडळ रत्नागिरीचे सचिव इम्तियाज सिद्दिकी यांनी प्रास्ताविक केले. तालुका विज्ञान मंडळ रत्नागिरीचे अध्यक्ष विजयानंद निवेंडकर यांनी स्पर्धेची रूपरेषा विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.