-दहीहंडीच्या थरारासाठी गोविंदा पथके सज्ज

-दहीहंडीच्या थरारासाठी गोविंदा पथके सज्ज
Published on

जिल्ह्यात अडीच हजार दहीहंड्या
सार्वजनिकमध्ये घट ; गोविंदा पथके सज्ज
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : दहीहंडी उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, जिल्ह्यातील गोविंदा पथके दहीहंड्या फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत. शनिवारी (ता. ५) दहीकाला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यात यंदा सार्वजनिक २८५ आणि खासगी २ हजार २९३ अशा एकूण २ हजार ५७८ दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सार्वजनिक दहीहंड्यांच्या संख्येत १८७ ने घट झाली आहे; मात्र, खासगी दहीहंड्यांमध्ये १५ ने वाढ झाली आहे.
दहीहंडीच्या निमित्ताने विविध राजकीय पक्ष आणि मंडळांकडून आकर्षक तसेच लाखो रुपये किमतीची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे दहीहंडी फोडण्याबरोबरच मोठी बक्षिसे पटकावण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. उत्सवाची तारीख जवळ येत असल्याने जिल्ह्यातील विविध गोविंदा पथकांचा सरावही जोरात सुरू झाला आहे. जिल्ह्यातील विविध शहरांसह ग्रामीण भागात दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. काही ठिकाणी सात ते आठ थरांची दहीहंडी उभारली जाणार आहे. उंच हंडी फोडण्यासाठी स्थानिक गोविंदा पथकांसह जिल्ह्याबाहेरील पथकेही सहभागी होतात. त्यामुळे यंदाही दहीहंडीच्या थरांचा थरार पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
दहीहंडीच्या थरांची उंची आणि गोविंदा पथकांची कसरत याबरोबरच बक्षिसांच्या रकमेमध्येही स्पर्धा रंगली आहे. विविध मंडळे आणि राजकीय पक्षांकडून रोख रक्कम, आकर्षक भेटवस्तू आणि इतर पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.
---
पोलिस ठाणेनिहाय दहीहंड्यांची संख्या

पोलिस ठाणे*सार्वजनिक* खासगी*
दापोली* ३७* ३१९
देवरूख* ११* ५७
खेड* ३२* १५०
रत्नागिरी ग्रामीण* २१* ८५
नाटे* ३* ५०
संगमेश्वर* ८* १२०
राजापूर* ४०* ७०
लांजा ८२* ३१
अलोरे-शिरगाव* ५* १२
जयगड* १* ५९
रत्नागिरी* १२* ९४
बाणकोट* ७* २६०
मंडणगड* २* ००
दाभोळ* ४* २५७
चिपळूण* १८* ३२०
सावर्डे* ३* ५४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com