गणेशोत्सवासाठी गुहागरमधून 173 एसटी फुल्ल

गणेशोत्सवासाठी गुहागरमधून 173 एसटी फुल्ल
Published on

गणेशोत्सवासाठी गुहागरमधून १७३ एसटी फुल्ल
प्रशासन जादा बसेस मागवणार; ३५ गाड्यांचे आगाऊ आरक्षण
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ३ : गणेशोत्सवासाठी येथील आगारामधून २० दिवस अगोदरच १७३ गाड्यांचे आरक्षण झाले आहे. गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी वाढ होण्याची शक्यता असून, ४०० पेक्षा जादा गाड्या बुकिंग होण्याचा अंदाज आगार व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. वाडीवस्तीवर येणाऱ्या चाकरमान्यांची बुकिंगची लगबग सुरू आहे. याबाबत माहिती देताना वाहतूक नियंत्रक स्वप्नील शिंदे यांनी सांगितले की, १९ ते २१ सप्टेंबर या कालावधीसाठी आगाराने विरार, बोरिवली, भांडुप, चिंचवड, विठ्ठलवाडी, कल्याण, स्वारगेट या मार्गावर जादा बससेवा दिली आहे. ३५ गाड्यांचे आगाऊ आरक्षण झाले आहे तर १३३ गाड्यांचे ग्रुप बुकिंग झाले आहे. आगारामध्ये एकूण ६१ गाड्या आहेत. यामध्ये लांब पल्ल्याकरिता १५ गाड्या चांगल्या गुणवत्तेच्या आहेत. आगारासाठी मिळालेल्या दहा नवीन गाड्यांमुळे लांब पल्ल्यासाठी या गणेशोत्सवामध्ये अधिक फायद्याच्या ठरणार आहेत.
गतवर्षी ३७३ गाड्यांचे बुकिंग झाले होते त्या तुलनेत यावर्षी जादा बुकिंग होण्याची शक्यता आहे. यामुळे ४०० पेक्षा जादा गाड्या बुकिंग होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. आगारासाठी लागणाऱ्या गाड्यांची व्यवस्था वरिष्ठ पातळीवरून सुरू असून, गतवर्षी ३५० जादा गाड्या लागल्या होत्या. त्याचप्रमाणे यावर्षीही यापेक्षाही जादा गाड्या लागण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी व चाकरमान्यांनी वेळेत एसटी महामंडळाच्या गाड्या बुकिंग कराव्यात, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com