दहाव्या वर्षीच कीर्तनकार म्हणून दाद मिळवणारी अनुज्ञा

दहाव्या वर्षीच कीर्तनकार म्हणून दाद मिळवणारी अनुज्ञा
Published on

rat४p९.jpg-
६१६५१
अनुज्ञा शेंबेकर
----------

दहाव्या वर्षीच कीर्तनकार म्हणून दाद मिळवणारी अनुज्ञा
भजन-कीर्तनी रंगलेले शेंबेकर कुटुंब; प्रसिद्धीपासून कटाक्षाने दूर
रत्नागिरी, ता. ४ ः एखाद्या बालिकेला आई-वडील, आजी-आजोबा, शिक्षक आणि वाडीतील काही मंडळीही सूरतालात रमणारी लाभली तर काय होऊ शकते, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सावर्डे येथील अनुज्ञा शेंबेकर. सातव्या वर्षापासून कीर्तनाचे धडे गिरवणाऱ्या या बालिकेने दहाव्या वर्षीच उत्तम कीर्तनकार अशी जाणकारांची दाद मिळवली आहे.
सावर्डे-कासारवाडी येथे गेली २५ वर्षे ओंकार भजन मंडळ सुरू आहे. हौशी भजनाची परंपरा या गावात गेली ७५ वर्षे आहे. या वाडीतील दहा कुटुंबातील ४५ माणसे संगीताने आणि सुराने जोडलेली आहेत. दुसरीत असताना अनुज्ञाने कीर्तन करण्याचा बालहट्ट धरला. वडिलांनी तो पुरवला. खेर्डी हे तिचे आजोळ. तेथील राममंदिरात तिने गुरूपौर्णिमेला एक तासाचे कीर्तन केले. अनुज्ञाचे वडील आशिष शेंबेकर भजन गातात, हार्मोनियम वाजवतात. अनुज्ञाची आई कीर्तन प्रवचन करत असे; मात्र सध्या त्या वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करतात.
अनुज्ञाची आजी अश्विनी शेंबेकर गाते आणि हार्मोनियम वाजवते. आजोबा अनिल शेंबेकर गातात आणि तबला वाजवतात. सुरांची आणि संगीताची परंपरा असे कोंदण अनुज्ञाला लाभले आहे. अनुज्ञाचे शिक्षक हेमंत तांबे हे कीर्तनकार असून, संगीताचेही उपासक आहेत. अनुज्ञाचे कुटुंब गोंदवलेकर महाराजांचे उपासक आहेत तसेच समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्याशी सतत संपर्क असतो त्यामुळे भक्तीमार्गाचा पगडा आहे. गुजरात राज्यात शिरगावमध्ये मराठी समाज आहे. तेथे गणपती मंदिरात माघी उत्सवात कीर्तन करण्याची आजवरची मोठी संधी अनुज्ञाला मिळाली. त्या कीर्तनानंतर आमच्या साऱ्यांचा आत्मविश्वास वाढला, असे तिच्या वडिलांनी सांगितले.

चौकट
पोपटपंची वाटता नये
बालिकेची कुवत ओळखून तिच्या बुद्धीला झेपेल, ती स्वतः एखादा विचार आत्मसात करून लोकांना सांगू शकेल असेच विषय कीर्तनासाठी आम्ही निवडतो. आज तिने तत्त्वज्ञान सांगणे पटणारही नाही आणि तिला ते झेपणारही नाही. त्यामुळे तिचे कीर्तन पोपटपंची ठरणार नाही, याची काळजी तिचे कुटुंबीय घेतात. यू ट्यूब आदी प्रसिद्धीपासून तिला दूर ठेवले आहे. पावसला होणाऱ्या कीर्तन शिबिरात ती आवर्जून भाग घेते. मकरंदबुवा रामदासी, आफळेबुवा, रोहिणी परांजपे यांच्या कीर्तनाचे संस्कार तिच्यावर घडतील, असा प्रयत्न सुरू आहे.

चौकट
बालिकेचे आकलन महत्वाचे
कीर्तनाचे लेखन करताना काळजी घेतो, असे सांगून आशिष शेंबेकर म्हणाले, आम्ही तिला मजकूर लिहून दिला की, तिच्या भाषेत तिने तो मांडावा यावर कटाक्ष असतो. मुळात तिला आकलन झाले नाही तर ती इतरांना काय सांगणार? कीर्तनाची ४ आख्याने तिची तयार झाली आहेत. सध्या अनुज्ञा चिपळूण येथील उत्तरा भागवत यांच्याकडे गाणे शिकत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com