

rat५p२.jpg-
P26O61882
रत्नागिरी- गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार करताना मनोज साळवी आणि अन्य मान्यवर.
-------
गुणवंतांचा गौरव, दातृत्वाचा आदर्श
फणसोप विकास सेवा सोसायटीचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नगिरी, ता. ५ : फणसोप विकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्यावतीने श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालयात शिक्षकदिनाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवसोहळा उत्साहात झाला. रत्नागिरीतील दानशूर नीता सावंत व त्यांचे चिरंजीव प्रतीक सावंत यांनी एका विद्यार्थिनीचा दहावीपर्यंतचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याची घोषणा केली तर नवीन साळवी यांनी दोन विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला.
जीवनविद्या मंडळ कसोप-फणसोप संचलित श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालयात आयोजित या सोहळ्यात मागलाड, फणसोप आणि वायंगणी परिसरातील गुणवंतांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये ‘इस्रो’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अंतराळ संशोधन संस्थेची सफर करण्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसह राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक आणि महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष मनोज साळवी, नवीन साळवी, अरविंद सावंत, हरिश्चंद्र शिंदे, सचिव राजेंद्र साळवी, रेणुका आग्रे, लीना देसाई, प्रवीण साळवी तसेच नीता सावंत आणि प्रतीक सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे जीवनविद्या मंडळ कसोप-फणसोप या संस्थेचे अध्यक्ष कमलाकर उर्फ बबनकाका साळवी, शाळा समिती अध्यक्ष प्रकाश साळवी, संस्था सदस्य रितेश साळवी व चेतन साळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.