

रामराजे महाविद्यालयात पाककृतींचे प्रदर्शन
दापोली ः कोकणच्या मातीत रुजलेल्या पारंपरिक रानभाज्यांचा विस्मृतीत चाललेला ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासोबतच त्यांचे पौष्टिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी रामराजे महाविद्यालयात रानभाज्यांपासून तयार केलेल्या नावीन्यपूर्ण पाककृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. मंगळवारी (ता.८) ११ वा. महाविद्यालयात हे प्रदर्शन होणार आहे. प्रदर्शनात भारंगी, टाकळा, कुरडू, करटोली, चिचार्डी, प्याव, दार, शतावरी आदी रानभाज्यांपासून तयार केलेल्या विविध चविष्ट व नावीन्यपूर्ण पदार्थांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘नानीचो वाडो’ कृषी पर्यटन संस्थेचे स्मितेश तांबे, पंचायत समिती सभापती उन्मेष राजे, संस्थापक डॉ. संदीप राजपुरे, तालुका कृषी अधिकारी हेमंत ठोंबरे, अध्यक्षा स्मिताली राजपुरे, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. दीपक हर्डीकर व प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण उपस्थित राहणार आहेत.
-rat५p५.jpg-
26O61886
राजापूर ः मानवी मनोरे उभे करत दहीहंडी फोडताना आरएसपीएम स्कूलचे विद्यार्थी.
---
‘आरएसपीएम’ स्कूलची दहीहंडी उत्साहात
राजापूर ः राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आरएसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा केला. विविध गाणी म्हणत, फेर धरून नाचत अन् एकावर एक थरांचे मानवी मनोरे उभे करत पारंपरिक वेषभूषेतील विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. देशभरामध्ये आज मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. त्याप्रमाणे शहरातील आरएसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलमध्येही दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये प्रशाळेतील विद्यार्थी, शिक्षक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
गोडे-दाते महाविद्यालयात दहीहंडी कार्यक्रम
राजापूर ः राजापूर हायस्कूल व गोडे-दाते महाविद्यालयामध्ये पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीकाला उत्सव साजरा केला. या उत्सवाच्या निमित्ताने शाळेच्या मैदानावर ‘आंधळी कोशिंबीर’ व दहीहंडी फोडणे या मनोरंजक कार्यक्रम रंगला. कार्यक्रमाला राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. छाया जोशी, उपाध्यक्ष अभय मेळेकर, संस्था सदस्य शैलेश आंबेकर, मुख्याध्यापक अरुण पोवार, उपमुख्याध्यापक भारत जानकर, पर्यवेक्षक विकास कुंभार आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.