

rat5p11.jpg
61890
चिपळूण ः गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचा गौरव करताना आमदार शेखर निकम.
-------------
स्पर्धेत टिकण्यासाठी मेहनत, संयम आवश्यक
आमदार निकमः चिंचघरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा गौरव
चिपळूण, ता. ६ ः उच्चशिक्षणानंतरच्या क्षेत्रात स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली असून, अपेक्षित नोकऱ्या मिळत नसल्याने बेरोजगारीचे प्रमाणही वाढत आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत, संयम आणि शिस्त बाळगावी. यशस्वी व्यक्तींच्या मेहनतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याचे अनुकरण करावे, असे आवाहन आमदार शेखर निकम यांनी केले.
सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या सती चिंचघरी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शुक्रवारी विद्यार्थी गुणगौरव सोहळा झाला. या वेळी आमदार निकम यांचे विद्यार्थ्यांनी ढोलताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत स्वागत केले. प्राचार्य संजय वरेकर यांनी प्रास्ताविकात शिष्यवृत्ती परीक्षेत सलग तिसऱ्या वर्षी शाळेने जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवल्याचे सांगितले. 3500 विद्यार्थीसंख्या असलेले हे जिल्ह्यातील एकमेव विद्यालय असून, शिष्यवृत्तीधारक 44 विद्यार्थ्यांना 32 लाख 90 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी शिष्यवृत्तीधारक तसेच विविध स्पर्धा परीक्षा आणि बारावी सीईटी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.