चिपळूणची 44 गावे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये

चिपळूणची 44 गावे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये
Published on

चिपळूणची ४४ गावे इकोसेन्सिटिव्हमध्ये
पर्यावरणीय निर्बंधांचे सावट; स्थानिकांच्या हरकतींकडे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ : पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या प्रारूप अधिसूचनेत चिपळूण तालुक्यातील तब्बल ४४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारने ३१ जुलै २०२४ ला प्रसिद्ध केलेल्या प्रारूप अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील एकूण ३११ गावे प्रस्तावित इकोसेन्सिटिव्ह क्षेत्रात आहेत. या ४४ गावांबाबत स्थानिकांच्या हरकती व सूचनांची प्रक्रिया केली असून, पुढील सुनावणी आणि अंतिम निर्णयाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
गावांमध्ये सह्याद्रीचा डोंगराळ परिसर, जंगल, जलस्रोत आणि जैवविविधतेचा मोठा पट्टा आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण महत्त्वाचे असले तरी प्रस्तावित निर्बंधांचा शेती, घरबांधणी, स्थानिक रोजगार, पर्यटन आणि भविष्यातील विकासकामांवर नेमका परिणाम काय होणार, याबाबत ग्रामस्थांमध्ये प्रश्न आहेत. स्थानिकांचा सहभाग घेऊन हरकतींची सखोल सुनावणी करावी आणि पर्यावरण संरक्षणासोबतच गावांच्या विकासाची गरज लक्षात घेऊन अंतिम निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चौकट
62159
चिपळूण तालुक्यातील समाविष्ट गावे
अडरे, अनारी, बामणोली, डेरवण, धाकमोली, दुर्गेवाडी, दुर्गवाडी खुर्द, गाणे, गणेशपूर, कादवड, कळकवणे, कामथे खुर्द, खरवते, खोपड, कोळकेवाडी, कोंडफणसवणे, कोंडमळा, कुडप, कुंभार्ली, कुटरे, मजरे (गोवळ), मंजुत्री, मोरवणे, मुंढेतर्फे चिपळूण, मुंढेतर्फे सावर्डे, नांदिवसे, ओवळी, पेढांबे, पेढे-परशुराम, फरूस, पोफळी, पोफळी बुद्रुक, रिक्टोली, शिरगाव, स्वयंदेव, तळवडे, तळसर, टेरव बुद्रुक, तिवडी, तिवरे, तुरंबव आणि उभाळे.

Marathi News Esakal
www.esakal.com