फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीचे मोफत प्रशिक्षण

फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीचे मोफत प्रशिक्षण
Published on

स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेत
फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीचे प्रशिक्षण
रत्नागिरी, ता. ६ : बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान येथे २८ सप्टेंबर ते २८ ऑक्टोबर या ३१ दिवसांच्या कालावधीत फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी प्रशिक्षण वर्गाचे आयोजित केले आहे. हे प्रशिक्षण सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत सलग असणार आहे.
प्रशिक्षणामध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी, सिनेमॅटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग बेसिक, अल्बम आणि फोटो डिझायनिंग, स्टुडिओ मॅनेजमेंट, कॅमेरा, लेन्स, मॅजिकल फोटोग्राफी, फॅशन पोजेस, वेडिंग आणि इव्हेंट्स इ. विषय प्रात्यक्षिकासह शिकविले जाणार आहेत. याचबरोबर तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास व उद्योजकता विकास याविषयी मार्गदर्शन होणार आहे. प्रशिक्षणात प्रशिक्षण, चहा नाश्ता, जेवण, निवास व्यवस्था आदी पूर्णपणे मोफत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येईल.
प्रशिक्षणासाठी वयोमार्यादा १८ वर्ष पूर्ण व ५० वर्षापर्यंत आहे. प्रशिक्षणासाठी अर्ज करणारा उमेदवार रत्नागिरी जिल्ह्याचा रहिवासी असावा. उमेदवार उमेद बचत गटातील सदस्य किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती किंवा एसईसीसी किंवा रोजगार हमी योजना कार्डधारक यापैकी एका पात्रतेत पात्र असणारी व्यक्ती प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. अर्ज भरण्यासाठी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, वक्रतुंड अपार्टमेंटजवळ, निसर्ग वसाहत, शांतीनगर, नाचणे रोड येथे कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com