

जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ
स्पर्धेसाठी नीरज इनामदारची निवड
सावर्डे, ता. ६ : क्रीडा व युवक संचालनालय आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित शालेय बुद्धिबळ स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील बुद्धिबळपटू नीरज इनामदार याने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. ही स्पर्धा चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूल येथे झाली. नीरज इनामदार हा गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे येथील विद्यार्थी आहे. या गटात एकूण ६३ खेळाडू सहभागी झाले होते. नीरजने सहापैकी चार सामन्यांत विजय मिळवत, तर दोन सामने बरोबरीत सोडवत उल्लेखनीय गुणांची कमाई केली. त्याच्या सातत्यपूर्ण व कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर त्याने जिल्हास्तरावर मजल मारली.
----------
मयूरपंखमध्ये गायत्री मांगडेचे सुयश
चिपळूण, ता. ६ : दापोली येथे आयोजित मयूरपंख आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवात जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या गायत्री चैतन्य मांगडे हिने एकपात्री अभिनय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. यासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, गोविंदराव निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम आणि उपप्राचार्य बाळासाहेब सूर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.