मंडणगडमधील एमआयडीसीचा प्रश्न लवकरच मार्गी

मंडणगडमधील एमआयडीसीचा प्रश्न लवकरच मार्गी
Published on

मंडणगड एमआयडीसीचा प्रश्न लवकरच मार्गी
गृहराज्यमंत्री योगेश कदम ः नळपाणी योजनेसाठी ४० कोटींचा निधी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ६ : मंडणगड तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी स्वीकारून भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि बदलत्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकासकामे करण्यात येत आहेत. मंडणगड शहराचा विस्तार होत असून, शहरासह तालुक्याला अधिक महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.
मंडणगड येथे शिवसेनेच्या वतीने दहीहंडी उत्सवानिमित्त नगरपंचायत परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी मंडणगड तालुक्याच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. मंडणगड तालुक्यात एमआयडीसी उभारून मोठे उद्योग आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती. मात्र, हा विषय केवळ चर्चेपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्षात आणण्यासाठी मागील दोन-तीन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना आता यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, तालुक्यातील पाट परिसरात एमआयडीसी उभारणीसह मोठे उद्योग येण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला. मंडणगड शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन नळपाणी योजनेसाठी ४० कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
--
मंडणगड एसटी स्थानकासाठी पाच कोटी ः
मंडणगड एसटी स्थानकाच्या विकासासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अनेक वर्षांपासून प्रवाशांकडून स्थानकातील अपुऱ्या सुविधांबाबत तक्रारी होत होत्या. आता स्वच्छतागृहांसह प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत एसटी स्थानकाचे स्वरूप बदलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com