

rat७p१८.jpg-
६२३३६
रत्नागिरी : उत्तर प्रदेश येथील कारागिर ढोलकी साकारताना.
लोगो... आले गणराय
पारंपरिक वाद्यांनी बाजारपेठ सजली
परराज्यांतील कारागिर रत्नागिरीत; ढोलकी, ढोल, ताशांना मागणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : गणरायाच्या आगमनाला आता फक्त काही दिवस शिल्लक राहिले असताना बाजारपेठा सजू लागल्या आहेत. तयार गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य आणि पूजाविधीचे साहित्य आणि पारंपरिक वाद्यांनी वातावरण गणेशमय होऊ लागले आहेत. रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, घराघरांत गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे.
गणराया हा ६४ कलांचा अधिपती असून, त्यातील संगीत ही कला त्याला अधिक प्रिय असल्याचे दिसून येते. त्यामुळे लाडक्या गणरायाच्या आगमन, स्वागतासाठी पारंपरिक वाद्यांना मागणी असते. उत्तरप्रदेशमधून ढोलकी साकारणारे अनेक कारागीर रत्नागिरीत दाखल झाले आहेत. प्रतिवर्षी ते येथे येतात. लहान व मोठ्या आकाराच्या ढोलकी खरेदीसाठी अनेकजण त्यांच्याकडे गर्दी करत आहेत. त्याप्रमाणे स्थानिक बाजारपेठेतही कारागिरांच्या दुकानात ढोलकी, तबल्याचा ठेका ऐकू येत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी मिरवणुका, आरत्या, भजन-कीर्तन आणि पारंपरिक वाद्यांचा वापर केला जातो. त्यामुळे गणेशोत्सव जवळ आला की, ढोलताशे, ढोलकी, झांज आदी वाद्यांना मोठी मागणी निर्माण होते. रत्नागिरीतील प्रमुख बाजारपेठांमध्ये सध्या ढोलताशांच्या दुकानांत ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. विशेष म्हणजे कोकणातील मागणी लक्षात घेऊन परराज्यांतून अनेक व्यापारी वाद्यांचा साठा घेऊन दाखल झाले आहेत. दुकानांमध्ये विविध आकारांचे ढोल, ताशे आणि ढोलकी मांडण्यात आल्या आहेत. त्यांच्या तालाची चाचपणी करताना बाजारपेठेत घुमणाऱ्या थापा गणेशोत्सवाचा उत्साह अधिकच वाढवत आहेत.
गणरायाच्या स्वागताचा जल्लोष अधिक रंगतदार करण्यासाठी ढोल-ताशांची थाप खरेदी करण्याची लगबग कायम आहे. गणेशोत्सवाच्या दिवसांत रत्नागिरीसह कोकणातील गावागावांत घुमणारा ढोल-ताशांचा नाद हा केवळ आवाज नसतो; तो कोकणच्या मातीत रूजलेल्या श्रद्धेचा, उत्साहाचा आणि परंपरेचा जिवंत ठोका असतो.
----------
चौकट १
बजेट वाढले
मुलांसाठी लहान आकाराच्या ढोलकीची किंमत २५० रुपये असून, मोठ्या ढोलकीच्या किंमती दर्जानुसार ५०० ते १००० रुपयांच्या पुढे आहेत. ढोल, ताशे आणि ढोलकीच्या आकारमानानुसार, बनावटीचा दर्जा, कातडीची गुणवत्ता यावर दर बदलतात. चांगल्या दर्जाच्या वाद्यांसाठी तुलनेने अधिक किंमत मोजावी लागत असल्याने मंडळांच्या तसेच घरगुती गणेशभक्तांच्या उत्सवाच्या बजेटवर अतिरिक्त भार पडत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.