

शालेय अभ्यासात आयुर्वेदाचा
समावेश करा ः अमेय परुळेकर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : देशातील आणि राज्यातील शालेय शिक्षणात केवळ शरीरशास्त्र न शिकवता शरीर निरोगी कसे ठेवावे, योग्य आहार-विहार पद्धती आणि आयुर्वेदातील मूलभूत घटकांची माहिती समाविष्ट करावी, अशी मागणी रत्नागिरीतील नागरिक अमेय परुळेकर यांनी केंद्रीय तसेच महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ब्रिटिशकाळापासून चालत आलेल्या शिक्षणपद्धतीत बदलाची गरज व्यक्त करत त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शाळांमध्ये मानवी शरीराची रचना, अवयव आणि त्यांची कार्ये याबद्दल शिकवले जाते; परंतु शरीर निरोगी ठेवण्यासाठी काय खावे, काय टाळावे आणि आहाराचे नियम काय असावेत या विषयी कोणतेही मार्गदर्शन केले जात नाही. उदा. जेवताना किंवा जेवण झाल्यावर लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावून आजार कसे निर्माण होतात, याचे शिक्षण मिळणे गरजेचे आहे.
तसेच आयुर्वेदानुसार शरीरातील वात, पित्त आणि कफ या तीन मूलभूत घटकांचे महत्त्व आणि त्यांचे संतुलन बिघडल्यास होणारे आजार याबद्दलची माहिती ४थी ते १०वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात दरवर्षी टप्प्याटप्प्याने समाविष्ट करावी जेणेकरून भावी पिढी निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगू शकेल, अशी विनंती परुळेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.