

-rat८p१९.jpg-
26O62639
रत्नागिरी : जांभेकर विद्यालयात बोलताना विद्यार्थी शिक्षिका. सोबत मुख्याध्यापिका संजना तारी, दिव्यता नागवेकर आदी.
जांभेकर विद्यालयात विद्यार्थी बनले शिक्षक
रत्नागिरी : सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात शिक्षकदिनाचे औचित्य साधून प्रशालेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ‘छात्र-अध्यापक’ म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका उत्साहाने पूर्ण केली. केवळ अध्यापनच नव्हे तर प्रशालेतील शिपाई, लिपिक, शिक्षक तसेच मुख्याध्यापक अशा विविध जबाबदाऱ्याही विद्यार्थ्यांनी स्वीकारून प्रशालेचे दैनंदिन कामकाज अनुभवले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत वर्गामध्ये अध्यापन केले, मुख्याध्यापिका संजना तारी आणि सांस्कृतिक विभागप्रमुख दिव्यता नागवेकर यांनी शिक्षकदिनाचे महत्त्व विशद केले.
-rat८p२०.jpg-
26O62640
रत्नागिरी- गोगटे-जोगळकेर महाविद्यालयात विज्ञानच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक होऊन प्रात्यक्षिक, अध्यापन केले.
--
विज्ञानच्या विद्यार्थ्यांनी केले विद्यार्थ्यांना अध्यापन
रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयातील विज्ञान विभागातील पदव्युत्तर विज्ञान मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पदवीपूर्वमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग घेत एक अनोखा उपक्रम राबवला. महाविद्यालयातील सात विभागातील एमएस्सी भाग १ आणि २ मधील ८७ विद्यार्थ्यांनी थेट शिक्षकांची भूमिका स्वीकारत प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना अध्यापन केले. व्याख्याने दिली, प्रयोगशाळेमध्ये प्रात्यक्षिक सत्रे घेतली. प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना क्लिष्ट वाटणारे विज्ञानाचे सिद्धांत अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
---
-rat८p२१.jpg-
26O62643
रत्नागिरी ः अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात बोलताना राजेंद्रप्रसाद मसुरकर.
अभ्यंकर-कुळकर्णी महाविद्यालयात शिक्षकदिन
रत्नागिरी : अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकदिन साजरा करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार, चरित्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर उपस्थित होते. प्रत्येक शिक्षकाने शिष्यत्व, क्षमतावृद्धी आणि कर्तव्यनिष्ठा हे तीन गुण अंगी बाळगावेत, असे विचार व्यक्त केले. या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, शिक्षक नानासाहेब हाके उपस्थित होते.
---
-rat८p२२.jpg-
26O62644
रत्नागिरी : केळ्ये येथील गुरूवर्य शांताराम गोडबोले विद्यामंदिरात बोलताना मुख्याध्यापिका स्नेहा पाटील.
गुरूवर्य शांताराम गोडबोले यांचा स्मृतिदिन
रत्नागिरी : केळ्ये येथे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गुरूवर्य शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यामंदिरात शिक्षकदिन आणि गुरूवर्य शांताराम यशवंत गोडबोले स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनी श्रावणी केळकर हिने गोडबोले यांच्याविषयी माहिती सांगितली. गुरूवर्य गोडबोले यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून समाजविकासासाठी योगदान द्यावे, असे मार्गदर्शन मुख्याध्यापिका स्नेहा पाटील आणि शिक्षिका अनघा रसाळ यांनी केले. गार्गी केळकर हिने सूत्रसंचालन तर वेदांत माने याने आभार मानले.
---
-rat८p२३.jpg-
26O62645
रत्नागिरी- मालतीबाई जोशी विद्यामंदिरमध्ये माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना विद्यार्थी, शिक्षक.
मालतीबाई जोशी विद्यामंदिरमध्ये शिक्षकदिन
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कै. मालतीबाई जोशी विद्यामंदिरात शिक्षकदिनी विद्यार्थी शिक्षकांच्या हस्ते माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्याध्यापक विलास पांचाळ यांनी विद्यार्थ्यांना डॉ. राधाकृष्णन् यांच्या कार्याची माहिती दिली. शिक्षक बनलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी वर्गवार जाऊन आपापले विषय अतिशय छान पद्धतीने शिकवले. शाळेच्या विभागप्रमुख संजना तारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.