

rat१०p१९.jpg-
26O63035
रत्नागिरी : तालुकास्तरीय विज्ञान नाटिका स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल शिक्षक मोहन बापट व सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देताना मान्यवर.
---
‘हरवलेली शाळा’ची जिल्हास्तरावर झेप
तालुकास्तरीय विज्ञान नाटिका स्पर्धा ; फाटक हायस्कूल प्रथम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवाच्या तालुकास्तरीय विज्ञान नाटिका स्पर्धेत रत्नागिरी तालुकास्तरावर फाटक हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. हरवलेली शाळा या नाटिकेची निवड जिल्हास्तरासाठी झाली आहे.
तालुका विज्ञान मंडळाकडून या स्पर्धेचे नियोजन उद्यमनगर येथील कॉन्व्हेंट स्कूलमध्ये करण्यात आले होते. राज्य विज्ञान शिक्षणसंस्था, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (नागपूर) या संस्थेकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत फाटक हायस्कूलमधील सहावी ते आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी विज्ञान नाट्यलेखन व दिग्दर्शन शाळेतील शिक्षक मोहन बापट यांनी केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता-मित्र, साधन की धोका? या विषयावर हा नाटिका साकारली. इरा गोखले, अवंती लिमये, विघ्नेश जोशी, मिहिर खाडीलकर, मेघना मलुष्टे, चिन्मय दामले, अंश पाटील, मानस पिलणकर हे विद्यार्थी या नाटिकेत सहभागी झाले होते. तसेच अर्णव पटवर्धन या विद्यार्थ्याने या नाटिकेसाठी पार्श्वसंगीत दिले. या नाटिकेसाठी शिक्षक वळवी यांचेही सहकार्य लाभले. स्पर्धेचे परीक्षण नेहा उकिडवे (दामले विद्यालय) आणि संघमित्रा कुरतडकर (निवळी हायस्कूल) आणि आकांक्षा भुर्के, (कुवारबाव उत्कर्षनगर) यांनी केले. या यशाबद्दल फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक राजन कीर, संस्थेचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परूळेकर, कार्याध्यक्ष दाक्षायणी बोपर्डीकर व सचिव राजीव गोगटे व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
---
सहभागी कलाकार
नाटिकेत इरा गोखले, अवंती लिमये, विघ्नेश जोशी, मिहिर खाडीलकर, मेघना मलुष्टे, चिन्मय दामले, अंश पाटील, मानस पिलणकर हे विद्यार्थी या नाटिकेत सहभागी झाले होते. तसेच अर्णव पटवर्धन या विद्यार्थ्याने या नाटिकेसाठी पार्श्वसंगीत दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.