बसस्थानकाच्या नूतनीकरणामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार

बसस्थानकाच्या नूतनीकरणामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार
Published on

मंडणगडातील बसस्थानकासाठी पाच कोटी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १० : मंडणगड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीसुविधांनीयुक्त असे नवीन बसस्थानक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. नवीन बसस्थानकामुळे तालुक्यातील नागरिकांची गैरसोय दूर होईल, असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला.
मंडणगड शहरातील बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन आणि प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शेडच्या लोकार्पणावेळी ते बोलत होते. मंत्री कदम म्हणाले, समस्यांवर तात्पुरत्या उपाययोजना करण्यापेक्षा त्यांचे कायमस्वरूपी निराकरण करणे आणि त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे मंडणगड बसस्थानकाच्या जुन्या इमारतीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी नवीन इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा पाठपुरावा केला. नवीन बसस्थानकामुळे परिसराचे सुशोभीकरण होण्याबरोबरच स्वच्छतागृहासह प्रवाशांच्या सुविधांशी संबंधित अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. बसस्थानक परिसरात तालुक्यातील महिला बचतगटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र मॉल उभारण्याचा प्रस्ताव तयार करा, अशा सूचना दिल्या आहेत.
कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सभापती प्रणाली चिले, नगराध्यक्षा सोनल बेर्डे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, उपसभापती दीपक मालुसरे, तहसीलदार अक्षय ढाकणे, आगारप्रमुख मदनीपाशा जुनेदी यांच्यासह पंचायत समिती सदस्य, शिवसेनेचे पदाधिकारी, आगारातील कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com