

rat11p1.jpg-
63213
रत्नागिरी : सोमेश्वर येथील कातळसड्यावर वनस्पती निरीक्षण करताना गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे विद्यार्थी व प्राध्यापक.
विद्यार्थ्यांनी केले सड्यावरील वनस्पतीचे निरीक्षण
वनस्पतीशास्त्र विभाग; परिसंस्थेच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास
रत्नागिरी, ता. ११ : गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे सड्यावरील वनस्पती निरीक्षणात विद्यार्थी रमले. विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक परिसंस्थांविषयी जाणीव निर्माण व्हावी आणि त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून निसर्गाचा अभ्यास करावा यासाठी विभागामार्फत या क्षेत्रभेटीचे आयोजन केले.
विद्यार्थ्यांनी सोमेश्वर येथील कातळसड्याला भेट देऊन कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण ‘सडा’ परिसंस्थेचा अभ्यास केला. पावसाळ्यात बहरणाऱ्या सड्यावरील विविध हंगामी, कंदवर्गीय, औषधी आणि कीटकभक्षी वनस्पतींचे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निरीक्षण केले. विभागातील प्रा. शरद आपटे यांनी विद्यार्थ्यांना सड्यावर आढळणाऱ्या विविध हंगामी वनस्पतींची माहिती दिली. त्यांनी लेटराइट परिसंस्थेची वैशिष्ट्ये, हंगामी वनस्पतींची वाढ, सड्यावरील प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वनस्पतींमध्ये आढळणारे अनुकूलन तसेच या वैशिष्ट्यपूर्ण अधिवासाचे पर्यावरणीय महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे वनस्पतींचे निरीक्षण करत क्षेत्राधारित अध्ययनाचा आनंद घेतला. क्षेत्रभेटीचे नियोजन प्रा. परेश गुरव यांनी केले.
चौकट
वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती
क्षेत्रभेटीत गुंडण, फोडशी, सितेची आसवं, मुरडानिया, गवती दवबिंदू, रानहळद, सोनकी आणि मोर खरचुडीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींची नोंद करण्यात आली. तसेच कंदीलपुष्पांच्या वैशिष्ट्यपूर्ण फुलोऱ्याने विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. यासोबतच शंखपुष्पी, गुंज, शतावरी आणि काळी मुसळीसारख्या औषधी वनस्पतींचेही निरीक्षण करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.