

मंगळागौर स्पर्धेत शिरगावचा विश्वकर्मा ग्रुप प्रथम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ''अतरंगी ग्रुप, मिऱ्या'' आयोजित मंगळागौर स्पर्धा २०२६ अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात झाली.
मराठा भवन येथे काल (ता. १०) झालेल्या स्पर्धेचे नियोजन अतरंगी ग्रुपमधील महिलांनी केले होते.
आदिती भाटकर यांच्या पुढाकारातून आणि ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या सहकार्यातून हा उपक्रम यशस्वी केला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक विश्वकर्मा ग्रुप, शिरगावने पटकावला असून त्यांना ७ हजार ७७७ रु. रोख व चषक देऊन सन्मानित केले गेले. द्वितीय क्रमांक स्वामी समर्थ ग्रुप, घवाळीवाडी यांना मिळाला असून, त्यांना ५ हजार ५५५ रुपये रोख आणि तृतीय क्रमांक स्वामिनी ग्रुप, परटवणे यांना देण्यात आला. त्यांना ३ हजार ३३३ रु. रोख व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षण प्रणाली तोडणकर आणि गौरी साबळे यांनी केले तर कार्यक्रमाचे ओघवत्या शैलीत सुंदर निवेदन संजया कीर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिती भाटकर, दीपिका मयेकर, अंकिता सुर्वे, संजना नार्वेकर, साक्षी नार्वेकर, जान्हवी पोयरेकर, अक्षरा भाटकर, आकांक्षा कीर, पूजा पिलणकर, आराध्या कीर यांच्यासह सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.