दाभोळे-आसगे-लांजा रस्ता कामाची चौकशी करा

दाभोळे-आसगे-लांजा रस्ता कामाची चौकशी करा
Published on

26O63469
एआय चित्र

सुस्थितीत रस्त्यावर कोट्यवधींचा भार
अभिजित राजशिर्के ः दाभोळे-आसगे-लांजा मार्ग, निविदेची चौकशी करा
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १२ ः तालुक्यातील दाभोळे-आसगे-लांजा-रूण-साटवली हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी सुस्थितीत आणि योग्य आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्याचे खड्डे भरणे, पुन्हा खडीकरण आणि मजबुतीकरण करणे, या कामासाठी सुमारे पाच कोटी रुपयांची निविदा काढली आहे. या प्रकरणाची चौकशी करावी आणि निविदा रद्द करावी, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे लांजा तालुका युवा अधिकारी अभिजित राजेशिर्के यांनी केली आहे.
लांजा येथील शिवसेना पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, रस्त्याच्या डांबरीकरण, मजबुतीकरण करणासाठी तीन कोटी ७२ लाख १० हजार ८७९ रुपयांना २५ मार्च रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. १६ जून रोजी निविदा प्रसिद्ध झाली. २३ जून ही निविदा भरण्याची अंतिम तारीख होती. २३ जून रोजी माहितीच्या अधिकारात अर्ज करून या कामाची माहिती घेतली असता या रस्त्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत, असे समजले. लांजा दाभोळे, आसगे, साठवली, रूण रस्ता गेली दोन वर्ष सुस्थितीत असून, एकही मोठा खड्डा नाही तरीही ५० एमलडी खडीने खड्डे भरण्यासाठी ३ लाख १० हजार ४०० रुपये, साडेनऊ मीटर खडीकरणासाठी १ कोटी ९६ हजार, कारपेटकरिता १ कोटी १५ हजार ६१२ रुपये, साडेनऊ किलोमीटर सिल्कोटकरिता ४ लाख २४ हजार रुपये खर्च दाखवण्यात आले आहेत. प्रत्यक्ष जमिनीवर कोणतेही काम न करता केवळ फाईल्स आणि बिलांवर काम पूर्ण झाल्याचे दाखवण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी केला. सुस्थितीत रस्त्यावर वारंवार खड्डे बुजवण्याच्या नावाखाली, पॅच मारण्याच्या कामासाठी वेगवेगळ्या पद्धतीने निधी टाकणे, खर्च करणे, हे प्रकार लांजात होत आहेत. हे काम कोणासाठी आणि कशासाठी, केले जात आहे? हा सर्व सामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे, असे प्रश्न राजेशिर्के यांनी उपस्थित केले आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी करून ज्या अधिकाऱ्यांच्या सहीने या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे.
या पत्रकार परिषदेला शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख युवराज हांदे, उपविभागप्रमुख राजू सुर्वे, उपविभागप्रमुख शांताराम गुरव, विभाग अधिकारी आदित्य कामत आदी उपस्थित होते.
---
आक्षेप अन् मागण्या
रस्ता गेली दोन वर्षे सुस्थितीत
पाच कोटींच्या कामाची निविदा
खड्डे नसताना खड्डे भरण्याचा खर्च
निविदा रद्द करण्याची मागणी
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com