

चिपळुणात ‘ढोलताशा, बेंजो’ना मागणी
गणेशोत्सव; विसर्जन मिरवणुकीसाठी आत्तापासून बुकिंग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने शहरासह तालुक्यातील गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गणरायाचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक अधिक आकर्षक करण्यासाठी ढोल-ताशा, बेंजो, झांज आणि लेझीम पथकांना मागणी वाढली आहे. विशेषतः साऊंड सिस्टीमच्या वाढत्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याकडे मंडळांचा कल असल्याचे चित्र आहे.
गतवर्षी चिपळूण तालुक्यात १६ हजार ७२५ घरगुती आणि १६ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन झाले होते. शहरातील विसर्जन मिरवणुकांमध्ये ढोलताशा, झांज, लेझीम यांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला होता.
चिपळूण शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आगमनापेक्षा विसर्जन मिरवणुकीसाठी ढोलताशा आणि बेंजो पथकांना अधिक मागणी असते. बाजारपेठ, बहादूरशेख नाका, वाशिष्ठी नदी परिसर आणि गोवळकोटच्या दिशेने होणाऱ्या मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्यांचा निनाद ऐकू येतो. गतवर्षीही चिपळूणचा नवसाचा राजा, चिपळूणचा महाराजा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, महावितरण कार्यालय आणि नगरपरिषदेच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुका लक्षवेधी ठरल्या होत्या. पथकातील वादकांची संख्या, कार्यक्रमाचा कालावधी, आगमन किंवा विसर्जन मिरवणूक आणि अंतर यानुसार मानधन निश्चित केले जाते. मोठ्या पथकांसाठी मंडळांना तुलनेने अधिक खर्च करावा लागतो. त्यामुळे काही मंडळांकडून आत्तापासून बुकिंगला प्राधान्य दिले जात आहे.
-----
कोट
आम्ही विघ्नहर्ता ढोल पथक चालवतो. मागील अनेक वर्षापासून शहरात आम्ही सेवा देतो. यावर्षी ग्रामीण भागातूनसुद्धा ढोलपथकाची मागणी वाढली आहे. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांचे गट तयार करून विविध ठिकाणी सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
- साहिल रानडे, विघ्नहर्ता ढोलपथक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.