अपघातग्रस्त कुटुंबाच्या मदतीला धावले

अपघातग्रस्त कुटुंबाच्या मदतीला धावले
Published on

अपघातग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात
विनायक राऊत यांचा पुढाकार ; उपचारासह प्रवासाची सोय
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १४ ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान राजकारणापलीकडचे माणुसकीचे दर्शन घडवले आहे. दौरा आटोपून परतताना वांद्री (ता. संगमेश्वर) येथे घडलेल्या अपघातातील पीडित कुटुंबाच्या मदतीला धावून जात त्यांनी तातडीने वैद्यकीय व पुढील प्रवासाची सोय करून दिली. हा प्रकार शनिवारी (ता. १२) घडला.
माजी खासदार विनायक राऊत यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा विविध सामाजिक व पक्षीय कार्यक्रमांनी गजबजलेला होता. सांत्वनपर भेटी, सौरपथदिव्यांचे लोकार्पण आणि स्व. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त शाळांमध्ये साहित्य वाटप आटोपून ते परतीच्या प्रवासात असताना वांद्री येथे दोन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न करता राऊत यांनी तातडीने आपले वाहन थांबवले आणि घटनास्थळी धाव घेतली. मुंबईतील सांताक्रुझ येथून गणेशोत्सवासाठी कणकवली तालुक्यातील हुमरड गावाकडे निघालेले सावंत कुटुंब या अपघातात संकटात सापडले होते. वाहनाचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने जीवितहानी टळली होती. अपघातामुळे घाबरलेल्या या कुटुंबाची राऊत यांनी आस्थेने विचारपूस केली. एका जखमी व्यक्तीवर तातडीने प्राथमिक उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. केवळ विचारपूस करून न थांबता, राजकीय पदापेक्षा माणुसकी जपत त्यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांच्या वाहनातून या अपघातग्रस्त दांपत्याला त्यांच्या साहित्यासह कणकवलीतील हुमरड गावी सुखरूप रवाना केले. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, गणेशभाई बाईंग, अनिकेत करमरकर, दिनेश देसाई यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com